मोठी बातमी! पोलीस भरती अर्ज भरण्यासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 03:51 PM2022-11-29T15:51:21+5:302022-11-29T15:54:00+5:30
गेल्या काही वर्षापासून रखडलेली पोलीस भरती अखेर आता होणार आहे. राज्यात १८ हजार जागांसाठी भरती होणार आहे. या संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
गेल्या काही वर्षापासून रखडलेली पोलीस भरती अखेर आता होणार आहे. राज्यात १८ हजार जागांसाठी भरती होणार आहे. या संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू आहे. उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख होती, पण वेबसाईट सतत बंद होत असल्या कारणाने उमेदवारांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे अनेकांनी अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्याची मागणी होत होती, या संदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पोलीस भरतीसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करु सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे, या संदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली, तसेच दर मंत्रिमंडळ बैठकीत ७५ हजार पद भरतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचही फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता ज्या उमेदवारांना पोलीस भरतीसाठी अर्ज भरताना अडचणी येत आहेत, त्यांना अर्ज भरता येणार आहे.
गेल्या काही दिवसापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण वेबसाईट मध्येच हँग होत असल्या कारणामुळे अर्ज करण्यास अडचणी येत आहेत. यावर राज्यभरातून मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होता. या मुद्द्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वेबसाइट हँगने सर्वांची तारांबळ, मुदतवाढ देण्याची मुंडेंची मागणी
नॉनक्रिमिलिअरसाठी काही तक्रारी आल्या होत्या, त्यावरही पर्याय काढला आहे. भूकंपग्रस्ताचाही यात समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत ११ लाख ८० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
लेखी परीक्षा एकाच दिवशी...
पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई व पोलीस चालक पदासाठी प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेत ४० टक्के गुण अपेक्षित
शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेत ४० टक्के पेक्षा कमी गुण मिळणारे उमेदवार अपात्र समजण्यात येणार आहेत.