Join us

रेशनकार्डधारकांसाठी गोड बातमी! राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 2:56 PM

रेशनकार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. केवळ १०० रुपयांमध्ये १ किलो रवा, चणाडाळ, साखर, तेल मिळणार आहे.

मुंबई: रेशनकार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. केवळ १०० रुपयांमध्ये १ किलो रवा, चणाडाळ, साखर, तेल मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी आता गोड होणार आहे. 

"दिवाळीनिमित्त १ कोटी ६२ लाख कार्डधारकांना म्हणजेच ७ कोटी लोकांना आम्ही दिवाळीचे एक पॅकेज देणार आहे, यात चार वस्तू आहेत, यामध्ये रवा, चनाडाळ, साखर, तेल अशा चार वस्तू यात आहेत. या चार वस्तु आम्ही पॅक करुन देणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

दसरा मेळाव्याला बीकेसीत ३ लाख गर्दी जमेल; मंत्री दीपक केसरकरांचा विश्वास

आज झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.  हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

हा शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. 

काही दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमिवर शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी पॅकेज जाहीर केले आहे. तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात बाळासाहेब ठाकरे आपल रुग्णालय सुरु करणार असल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार