Join us

असे नेते जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर...; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला 'इशारा' अन् एकच हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 2:38 PM

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपमध्ये काँग्रेसमधून येणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी होती.सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपमध्ये काँग्रेसमधून येणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी होती.सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. २०१४ च्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीही सुरू केली आहे. या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. काल एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एका काँग्रेस नेत्याला भाजपमध्ये येण्यासाठी सूचक इशारा दिला. यावरुन सभागृहात एकच हशा पिकला तर राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. 

पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. गॅविन न्यूसम लिखित सिटीझनविल या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी केले आहे, या पुस्तकाचे काल  काल सायंकाळी प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी फडणवीस यांनी मनेगत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या कामाचे कौतुक केले, तसेच भाजपमध्ये येण्यासाठी सूचक इशाराही दिला.    

या कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांचे कौतुक केले, आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रारही केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'बाळासाहेब, माझी एक तक्रार आहे. सत्यजीतसारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर आमचाही डोळा त्यांच्यावर जातो. कारण चांगली माणसं जमाच करायची असतात, असंही फडणवीस म्हणाले. या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाकाँग्रेससत्यजित तांबे