Join us  

अजित पवार मंत्र्यांसह आमदारांवर संतापले; अध्यक्षांकडे केली सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 3:39 PM

अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली.

मुंबई- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कॉपी आणि माफीने गाजला. तसेच, राज्यात भरतीच्या परींक्षांमध्ये सुरू असलेला घोळ आणि भ्रष्टाचार यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभागृहात आक्रमपणे आपली भूमिका मांडत होते. यावेळी, भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आपण हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही विरोधकांनी पायऱ्यावर बसून केली. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपमु्ख्यमंत्री अजित पवार सभागृहातील सदस्यांवर चांगलचे संतापलेले दिसले. 

अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणी देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. एखाद्या सदस्याला बोलताना त्रास होत असेल तर आपलं बोलून झाल्यानंतर पुन्हा मास्कचा वापर करावा असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून व्यक्त केलेल्या संतापानंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली. 

परदेशात दिड दिवसाला दुप्पट रुग्णसंख्या वाढतेय इतकी भीषण स्थिती आहे. ज्या त्या वेळेत कोरोनाचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. मास्क न लावणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढा. मास्क घातला नाही तर कितीही कोणी प्रयत्न केला तर हे नियंत्रणात येणार नाही. आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर व्हायरल होतात. ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवा असं अजित पवार यांनी सांगितले.

देशात रात्री लॉकडाऊन लागणार?

अधिवेशन सुरु झाल्यापासून आज दुसरा दिवस आहे. आपण प्रत्येकजण ३-४ लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात बसतो. देशाचे पंतप्रधानदेखील कोरोना संकटावर गांभीर्याने विचार करत आहेत. सध्या कोरोनाचं संकट आहे त्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करत आहे. देशपातळीवर रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

टॅग्स :अजित पवारविधानसभा हिवाळी अधिवेशनमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस