Join us  

Ajit Pawar: नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 7:15 PM

Ajit Pawar Replay on Nitin Gadkari Letter: नितीन गडकरींच्या पत्रावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Ajit Pawar Replay on Nitin Gadkari Letter: राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप करणारं खळबळजनक पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गडकरींच्या पत्रावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

शिवसेनेच्या दहशतीमुळे राष्ट्रीय मार्गांची कामे बंद करण्याची वेळ, नितीन गडकरींचा लेटरबॉम्ब, लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

"ठेकेदार जर चांगलं काम करत असेल आणि काही जण राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करुन कुणाला त्रास देत असतील असले प्रकार ताबडतोब थांबले पाहिजेत", असं रोखठोक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’मध्ये आहे काय?, माध्यमांत रंगली दिवसभर चर्चा; लोकमतकडे पत्राची प्रत

"मी गेल्या ३० वर्षांपासून समाजकारणात व राजकारणात काम करत असताना नेहमी सांगत आलोय की हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशाचा वापर चांगल्या कामासाठीच झाला पाहिजे. कामाचा दर्जा देखील चांगला राखला गेला पाहिजे. तो जर तसा राखला जात नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे", असंही अजित पवार म्हणाले. 

अजित पवारांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही पाठराखण केली. "मी गेल्या पावणेदोन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांसोबत काम करत आहे. त्या दरम्यान अनेक उदघाटनं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांवेळी त्यांचं एकच सांगणं असतं ते म्हणजे कामाचा दर्जा चांगला ठेवा. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीवेळीही पर्यावरण, कामाचा दर्जा, विकास कामादरम्यान वृक्षतोड कशी टाळता येईल यासाठी त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे याप्रकरणी ते लक्ष घालतील आणि शहानिशा करतील याबाबत मला १०० टक्के खात्री आहे", असं अजित पवार म्हणाले. 

नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक शिवसेना लोकप्रतिनिधींकडून अडथळा आणला जात असल्याचा आरोप करत दोन पानी पत्र लिहिलं आहे. यात गडकरींनी राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे. यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे याबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :अजित पवारनितीन गडकरीउद्धव ठाकरे