'याद आ रही है...'; जयंत पाटलांच्या कवितेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, सभागृहात पिकला एकच हशा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 06:34 PM2023-03-15T18:34:16+5:302023-03-15T18:43:42+5:30

जयंत पाटलांच्या या कवितेवर आज देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

Deputy CM Devendra Fadnavis' reply to NCP MLA Jayant Patal's poem, there was only one laugh in the hall | 'याद आ रही है...'; जयंत पाटलांच्या कवितेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, सभागृहात पिकला एकच हशा

'याद आ रही है...'; जयंत पाटलांच्या कवितेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, सभागृहात पिकला एकच हशा

googlenewsNext

मुंबई: देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री झाले, तेव्हापासून आपण त्यांचा चेहरा पाहत आहोत. तेव्हा माझ्या एक बाब लक्षात आली की, देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा सात-आठ महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांना चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचं तंत्र काही जमलं नव्हतं. आता त्यांना हे तंत्र जरा जमलं आहे. त्यांनी ते आत्मसात केलं आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला होता. 

जयंत पाटील म्हणाले, आता ते छान आणि बऱ्यापैकी हसतात. त्यावर मला सहज काही ओळी आठवल्या. या ओळी दुसऱ्यांच्या आहेत मी फक्त वाचून दाखवतो...

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो
आँखों में नमी हँसी लबों पर
क्या हाल है क्या दिखा रहे हो....असं म्हणत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर टोलेबाजी केली होती. 

जयंत पाटलांच्या या कवितेवर आज देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही काल चांगलं गाणं म्हणालात. पण ते बहुतेक स्वत:साठी बोलत होते. तुम्हाला आम्ही बसलोय त्या रांगेची याद आ रही हैं...याद आने से तेरे जाने से, जान जा रही है...असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांच्या या ओळीनंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

दरम्यान, जेव्हा सगळे आमदार गुवाहाटीला गेले, तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं मला वाटलं होतं. पण अचानक एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती, किंग नाही झालो तर किंग मेकर तरी होऊ… पण आता बघितलं तर किंगमेकर दिल्लीत बसले आहेत. इकडे आपल्या हातात फारसं राहिलं नाही. सगळं काही दोन नंबरच्या हातात आहे. त्यामुळे ‘क्या हाल है क्या दिखा रहे हो’ ही ओळ सगळ्यात महत्त्वाची असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. 

Web Title: Deputy CM Devendra Fadnavis' reply to NCP MLA Jayant Patal's poem, there was only one laugh in the hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.