अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन, देशमुख यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:35 PM2021-09-09T12:35:45+5:302021-09-09T12:36:27+5:30

विधानभवनात बुधवारी झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी 5 हजार रुपयंच्या मानधनाबाबतची माहिती दिली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

Deshmukh announces honorarium of Rs 5 thousand to warkari of | अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन, देशमुख यांची मोठी घोषणा

अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन, देशमुख यांची मोठी घोषणा

Next
ठळक मुद्देविधानभवनात बुधवारी झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी 5 हजार रुपयंच्या मानधनाबाबतची माहिती दिली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

मुंबई - कोरोना महामारीच्या संकटात मंदिर परिसरातील अनेक व्यवसायिक, मंदिरातील कर्मचारी, लहान-सहान मंदिरातील पुजारी वर्गही आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे, या मंदिरातील पुजाऱ्यांना सरकारने मानधन देण्याची मागणी करण्यात येत होती. पंढरपुरातील वारकऱ्यांनीही अशी मागणी केली होती. त्यानुसार, कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्याला महिन्याला 5 हजार रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

विधानभवनात बुधवारी झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी 5 हजार रुपयंच्या मानधनाबाबतची माहिती दिली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे यावेळी अमित देशमुख यांनी सांगितले. वारकरी साहित्य परिषदेने काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य असे संतपीठ उभे रहावे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या मागण्या बैठकीत मांडल्या होत्या.


पंढरपूरमधील वारकरी संप्रदायाने यंदाही आपल्यातील संयम दाखवून दिला. कोरोना संकटामुळे यंदाही वारी हुकली, सुरुवातीला आक्रमक झालेल्या वारकऱ्यांनी पुन्हा सरकारच्या शब्दाला मान दिला. त्यामुळे, यंदाही वारीचा, आषाढाची उत्सव अतिशय साधेपणाने वारकऱ्यांविना आनंदात पार पडला. दरम्यान, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांनी अडचणीत सापडलेल्या वारकऱ्यांना महिन्याला 5 हजार रुपये देण्याची घोषणा केल्याने या वारकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. 
 

Web Title: Deshmukh announces honorarium of Rs 5 thousand to warkari of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.