सेना-भाजपमध्ये असला वाद तरी वॉटर टॅक्सी सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 09:01 AM2022-01-04T09:01:34+5:302022-01-04T09:01:43+5:30
देशांतर्गत क्रूझ टर्मिनल ते बेलापूर, नेरूळ, ऐरोली, जेएनपीटी, रेवस, करंजाडे, धरमतर, एलिफंटा या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार आहे.
- सुहास शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांचा प्रवास राजकीय कटुतेच्या प्रवाहातून सुरू असला तरी त्याचा परिणाम विकासकामांवर होऊ नये यासाठी दोन्ही पक्ष दक्ष आहेत. त्याचाच एक नमुना सोमवारी पहायला मिळाला. नवी मुंबईला दक्षिण मुंबईशी जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनासाठी जानेवारीच्या मध्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी या कामाची स्पीड बोटीतून पाहणी केली.
देशांतर्गत क्रूझ टर्मिनल ते बेलापूर, नेरूळ, ऐरोली, जेएनपीटी, रेवस, करंजाडे, धरमतर, एलिफंटा या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार आहे. यासाठी कॅटामरान श्रेणीतील हायस्पीड बोटींची ट्रायल रनही होते आहे. त्याचा परवाना मिळविलेल्या इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसने चार बोटींसह ट्रायल रन सुरू केली.
मार्गिका
देशांतर्गत क्रूझ टर्मिनल ते एलिफंटा
देशांतर्गत क्रूझ टर्मिनल ते जेएनपीटी
मार्गिका - बेलापूर ते जेएनपीटी आणि एलिफंटा
मार्गिका - देशांतर्गत क्रूझ टर्मिनल ते बेलापूर
किती फेऱ्या होतील?
n१२ १२ अशा २४ फेऱ्या होतील.
nवर्दळीच्या मार्गावर दर तासाला बोट सोडण्याचे नियोजन
तिकीट किती
एकल मार्ग - ७०० रुपये
दुहेरी मार्ग - १२०० रुपये
बल्क बुकिंग (एकल) - ५००
बल्क बुकिंग (दुहेरी) - ८००
मासिक पास : ११,०००
रुपये (अमर्यादित प्रवास)
या बोटींची आसनक्षमता ५०, ४०, ३२, १४ अशी आहे. देशातील या सेवेच्या उद्घाटनाला पंतप्रधानांसह रशियन प्रतिनिधींचे शिष्टमंडळही उपस्थित राहणार आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मरिटाइम बोर्ड आणि सिडको प्रशासनाच्या भागीदारीतून हा प्रकल्प नावारूपास आला. या सेवेला ‘वॉटर मेट्रो’ हे नाव देण्याचे प्रस्तावाधीन आहे.
बोटीची वैशिष्ट्ये
nकॅटामरान श्रेणीतील
हायस्पीड बोट. ताशी वेग
२५ नॉटिकल माइल्स
nवातानुकूलित
nखानपान सुविधा, लाईफ जॅकेटसह अत्याधुनिक आसनव्यवस्था
nशौचालय
पावसाळ्यात
सुरू राहणार
nपावसाळ्यात येणाऱ्या सर्व आव्हानांचा प्रतिकार करण्याची क्षमता या बोटीत आहे.
nफेरीसेवेप्रमाणे पावसाळ्यात
वॉटर टॅक्सी सुविधा बंद ठेवली जाणार नाही.
nवर्दळीचे मार्ग वगळता इतर मार्गावर सकाळ आणि सायंकाळच्या वेळीच सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसचे सोहेल कझानी यांनी दिली.