Join us  

कोस्टल रोडची भरारी

By admin | Published: February 29, 2016 2:31 AM

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सुचविलेला कोस्टल रोडचा विस्तार मीरा रोडपर्यंत करण्यात येणार आहे़ तूर्तास या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यात येत आहे़

शेफाली परब-पंडित, मुंबईपश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सुचविलेला कोस्टल रोडचा विस्तार मीरा रोडपर्यंत करण्यात येणार आहे़ तूर्तास या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यात येत आहे़ तोपर्यंत पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंतचा सागरी मार्ग तयार करण्यासाठी आणखी दोन महिन्यांनी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे़ काँग्रेस सरकारच्या काळात मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्राधान्य दिले आहे़ त्यामुळे पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाला वेग मिळू लागला़ हा सागरी मार्ग मीरा रोडपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने नुकताच सरकार दरबारी मांडला़ मात्र, पहिल्या टप्प्यात कामाला सुरुवात झाल्यानंतर या विस्ताराची व्यवहार्यता तपासली जाणार आहे़नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंतचा सागरी मार्ग ३३़२ कि़मी़ आहे़ मीरा रोडपर्यंतचा विस्तार किती कि़मी़ असेल, याचा अद्याप अंदाज घेण्यात आलेला नाही़ गेली काही वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाचा बार उडवून देण्यावर पालिकेचा भर आहे़ हे काम सुरू झाल्यानंतर विस्तराचा मार्ग आणि त्याच्या वाढीव खर्चाचा अंदाज घेण्यात येणार असल्याचे, पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)समुद्रात भरावसागरी मार्गासाठी समुद्रात १६० हेक्टर्स भराव टाकण्यात येणार आहे़ यापूर्वी केवळ बंदर बांधण्यासाठी अशा प्रकारचे भराव टाकण्याची परवानगी देण्यात येत होती़ मात्र, रस्त्यासाठी समुद्रात भराव टाकण्याची परवानगी मिळालेली मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका ठरणार आहे़जागतिक निविदा या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर निविदा मागविण्यात येणार आहेत.एप्रिलमध्ये ही प्रक्रिया सुरू होणार आहे़ अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असल्याने, जागतिक स्तरावरील अनुभवी कंपनीला आमंत्रित करण्यात आले आहे़हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षाकेंद्र सरकारकडून सागरी नियंत्रण क्षेत्राचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रियदर्शनी पार्क ते वांदे्रपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे़ हे प्रमाणपत्र येण्यापूर्वी या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेख़र्च वाढलातत्कालीन आयुक्त सुबोधकुमार यांनी हा प्रकल्प २०१२ मध्ये मांडला़, तेव्हा त्याचा अंदाजित खर्च आठ हजार कोटी होता़ मात्र, गेले काही वर्षे हा प्रकल्प रखडल्यामुळे आता याचा खर्च १२ हजार कोटींवर पोहोचला आहे़ २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहेक़ोस्टल रोडचे फायदेवायुप्रदूषण कमी होईल व इंधनाचीही बचत होणार आहे़ वाहतूककोंडीमुळे सध्या नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंतच्या प्रवासाला दीड ते दोन तास लागत होते़ सागरी मार्गामुळे ४० ते ५० मिनिटांमध्ये हा मार्ग पार होणार असून, यामुळे वेळेची बचत होईल़ बेस्टच्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास जलद व दिलासादायी होणार आहे़नरिमन पॉइंट ते मीरा-भार्इंदरच नव्हे, तर अहमदाबाद महामार्गापर्यंत विस्तार होणार आहे़ त्यामुळे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे़