मुंबई : नामांकित कंपन्यांची बनावट घड्याळे बनवून त्यांची बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने पर्दाफाश केला आहे. मशीद बंदर येथील त्यांच्या कारखान्यावर छापा मारत २१ लाखांची बनावट घड्याळे हस्तगत केली आहेत. अफजल अहमद मोहम्मद आरिफ अन्सारी (४०) असे आरोपीचे नाव आहे.गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मशीद बंदर येथील काझी सय्यद स्ट्रीटच्या दुसºया माळ्यावरील खोली क्रमांक २०६ मध्ये ही बनावट घड्याळे बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा मारत ४ हजार १८० बनावट घड्याळे जप्त केली आहेत. याची किंमत २० लाख ९७ हजार ४५० रुपये इतकी आहे. कारखान्याला टाळे ठोकत गुन्हे शाखेने कारखाना मालक अन्सारी याला अटक केली आहे. घड्याळे खरी असल्याचे भासवून त्यांची तो विविध बाजारांत विक्री करीत असे. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.
नामांकित कंपन्यांची बनावट घड्याळे बनवणारा कारखाना उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:41 AM