टिळकांच्या स्मृतिस्थळांचा ऱ्हास

By admin | Published: July 23, 2016 02:06 AM2016-07-23T02:06:15+5:302016-07-23T02:06:15+5:30

मुंबईतील सरदारगृह, डोंगरीचा तुरुंग, गिरगावातील शांताराम चाळ, केशवजी नाईक चाळ या स्मृतिस्थळांचा ऱ्हास होत आहे.

Destruction of Tilak's Memorials | टिळकांच्या स्मृतिस्थळांचा ऱ्हास

टिळकांच्या स्मृतिस्थळांचा ऱ्हास

Next


मुंबई : लोकमान्य टिळक यांचे वास्तव्य असलेल्या मुंबईतील सरदारगृह, डोंगरीचा तुरुंग, गिरगावातील शांताराम चाळ, केशवजी नाईक चाळ या स्मृतिस्थळांचा ऱ्हास होत आहे. लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ या सिंहगर्जनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आॅब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनने पत्र पाठविले आहे.
लोकमान्यांच्या वास्तव्याने ऐतिहासिक ठरलेल्या वास्तूंची स्थिती सध्या अत्यंत जर्जर झालेली आहे. विशेषत: मुंबईतील ज्या वास्तूत लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला, त्या सरदारगृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. सरदारगृहाची दर्शनी बाजू अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहे. स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेली ही वास्तू सध्या अक्षम्य अवहेलना अनुभवत आहे.
त्याचप्रमाणे डोंगरीचा तुरुंग जिथे टिळक-आगरकरांनी १०१ दिवस कारावास भोगला, गिरगावातील शांताराम चाळ जिथे टिळक-गांधी-जिना यांची ऐतिहासिक सभा झाली आणि गिरगावातील केशवजी नाईक चाळ ज्या ठिकाणी लोकमान्यांच्या प्रेरणेतून गणेशोत्सव साजरा झाला, तेथे साधे स्मृतिफलकही नसल्याचे आढळले आहे. (प्रतिनिधी)
>अशा आहेत मागण्या...
लोकमान्यांच्या स्मृतिस्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.
स्मृतिस्थळांचा आणखी ऱ्हास होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने पावले उचलावित.
टिळक संग्रहालयाच्या देखभालीसाठी आर्थिक मदत करावी.
>पुणे येथील टिळक स्मारक आणि रत्नागिरी येथील लोकमान्यांचे जन्मस्थान राष्ट्रीय स्मारक जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील संग्रहालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, येथील वस्तू कालक्रम, विषयानुसारही मांडण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले.
शिवाय येथील संग्रहालयासाठी शासन कोणतीच मदत करीत नाही. संपूर्ण जबाबदारी टिळक कुटुंबीय सांभाळत आहे. रत्नागिरीच्या ज्या घरात लोकमान्यांचा जन्म झाला, त्याचेही संवर्धन होणे गरजेचे आहे.
>लोकमान्यांच्या वास्तव्याने ऐतिहासिक ठरलेल्या वास्तूंची स्थिती सध्या अत्यंत जर्जर झालेली आहे. विशेषत: मुंबईतील ज्या वास्तूत लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला, त्या सरदारगृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. सरदारगृहाची दर्शनी बाजू अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहे. स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेली ही वास्तू सध्या अक्षम्य अवहेलना अनुभवत आहे.

Web Title: Destruction of Tilak's Memorials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.