आयपीएस अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचा तपशील हवा
By admin | Published: December 14, 2015 02:09 AM2015-12-14T02:09:58+5:302015-12-14T02:09:58+5:30
राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांना मालमत्तेचा तपशील व गेल्या दोन आर्थिक वर्षांचे विवरणपत्र सादर करावयाचे आदेश केंद्रीय
मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांना मालमत्तेचा तपशील व गेल्या दोन आर्थिक वर्षांचे विवरणपत्र सादर करावयाचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबत सूचना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती दरवर्षी शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे. भारतीय सेवा अधिकारी कलम ४४ अन्वये लोकपाल व लोकायुक्त कायदा २०१३ अनिवार्य आहे. त्याबाबत गृह विभागाकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये २०१४-१५ व २०१५-१६ या आर्थिक वर्षातील ज्ञात मालमत्ता, दायित्वांची माहिती कळवायची आहे. . (प्रतिनिधी)