सीईटी परीक्षांचा तपशील जाहीर; सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन

By सीमा महांगडे | Published: March 15, 2023 09:38 PM2023-03-15T21:38:31+5:302023-03-15T21:38:40+5:30

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पार पडणार आहे.

Details of CET Exams Announced; CET Cell appeals to students to apply on time | सीईटी परीक्षांचा तपशील जाहीर; सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन

सीईटी परीक्षांचा तपशील जाहीर; सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन

googlenewsNext

मुंबई: राज्य सामाईक पात्रता परीक्षा कक्षामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत . तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची अर्ज नोंदणी सुरू असून, सीईटी सेलकडून पुन्हा परीक्षा राज भरण्याचा तपशील आणि परीक्षेचा कालावधी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी जाहीर केला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पार पडणार आहे. सदर परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अधिक माहितीसाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या सीईटी परीक्षांचा अभ्यासक्रम आणि  उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील सीईटीसाठीचा अभ्यासक्रम ही सीईटी सेलकडून अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे.सर्वात पहिली सीईटी परीक्षा व्यवस्थापन शास्रातील प्रवेशांसाठी घेण्यात येणार आहे.

परीक्षांच्या वेळापत्रकाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

प्रवेश परीक्षेचे नाव - ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत - परीक्षेची दिनांक

१) एमबीए - ११ मार्च - २५ ते २६ मार्च

२) एमसीए - ११ मार्च - २७ मार्च

३) विधी ५ वर्ष - २३ मार्च - २० एप्रिल

४) एमपीएड - १८ मार्च - २३ एप्रिल

५) बी.एड. - १८ मार्च - २३ ते २५ एप्रिल

६) एमएचटी सीईटी - १५ एप्रिल - ९ ते २० मे

७) बी.एड.एम.एड - २० मार्च - २ एप्रिल

८) बी.ए. किवा बीएससी बीएड - १७ मार्च - २ एप्रिल

९) एएसी - १८ मार्च - १६ एप्रिल

१०) विधी ३ वर्ष - २५ मार्च - २ ते ३ मे

Web Title: Details of CET Exams Announced; CET Cell appeals to students to apply on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.