मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी (नॅड) या केंद्र सरकारच्या डिजिटल पोर्टलवर यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या १ लाख, ९३ हजार,५८९ पदव्यांचा तपशील पडताळणीसाठी आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. नॅडच्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ही सेवा उपलब्ध होईल. याद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी होणार असून, बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणांना आळा बसणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाने या सेवेसाठी नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) या संस्थेची नियुक्ती केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, विद्यापीठात नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती आॅनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएलसोबत मुंबई विद्यापीठाने करार केला आहे. त्यानुसार, विद्यापीठाने २०१३ पासून ते २०१९ पर्यंतची सहा वर्षांची ११ लाख विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती या नॅडच्या आॅनलाइन पोर्टलवर आहे. या सुविधेचा उपयोग करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नॅडच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी विद्यापीठाच्या ६६६.े४.ंू.्रल्ल या संकेतस्थळावर मुख्य पृष्ठावर स्क्रोलिंगमध्ये आॅनलाइन नॅड रजिस्ट्रेशन या सदराखाली एक लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. एनएसडीएलचे प्रतिनिधी नोंदणी करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध महाविद्यालयास भेटी देणार आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील हे सध्या जिल्ह्यानिहाय प्राचार्यांच्या बैठका घेऊन, प्राचार्यांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे निर्देश देत असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.>पडताळणीसाठी विद्यापीठात येण्याची गरज नाहीदेशातील, तसेच विदेशातील शासकीय, खासगी आस्थापना, विद्यार्थी व इतरांना या शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी आॅनलाइन स्वरूपात तत्काळ करण्याची सुविधा यात असल्याने, पडताळणीसाठी येथून पुढे विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करावी.- डॉ. सुहास पेडणेकर,कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
दोन लाख पदव्यांचा तपशील आता पडताळणीसाठी ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 5:47 AM