विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील आज जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:43 AM2019-08-09T03:43:01+5:302019-08-09T03:43:08+5:30

अकरावी प्रवेश प्रक्रिया; वेळापत्रक जाहीर, प्रवेश न मिळालेले विद्यार्थी करू शकणार अर्ज

Details of the vacant seats for the special round will be announced today | विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील आज जाहीर होणार

विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील आज जाहीर होणार

Next

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरीचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केले आहे. विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील शुक्रवारी सकाळी १० वाजता आॅनलाइन जाहीर होईल. विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर त्यासंदर्भातील माहिती पाहू शकतील. अकरावी प्रवेशाच्या ३ फेऱ्यांनंतरही अद्याप कोणत्याही महाविद्यालयांत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीमध्ये संधी मिळेल.

९ आणि १० आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत आॅनलाइन प्रवेश अर्ज करता येणार असून १४ आॅगस्ट रोजी या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होईल. १६ ते १९ आॅगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती करण्याची मुदत मिळेल. त्यानंतर प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीची सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने दिली. या फेरीत आतापर्यंत कोणत्याही फेरीमध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी (पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट होऊनही), विशेष फेरीपर्यंत कोणतेही महाविद्यालय न मिळालेले, प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या फेरीमधील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे तीन प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात ८० टक्के व त्याहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी, दुसºया प्रकारात ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी तसेच पहिल्या प्रकारातील ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत असे विद्यार्थी आणि तिसºया प्रकारात दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी तसेच पहिल्या आणि दुसºया प्रकारातील ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही असे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

ही प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी २० आॅगस्ट ते २७ आॅगस्टपर्यंत सुरू राहील. त्यानंतर २७ आॅगस्ट रोजी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये सुरू होणार असून, उशिरा प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिरिक्त वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक विभागाने केल्या आहेत.

विशेष फेरीचे वेळापत्रक
९ आॅगस्ट २०१९ - सकाळी १० वाजता रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार.
९ व १० आॅगस्ट - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अ‍ॅनलाइन अर्जाचा भाग १ आणि भाग २ भरून पूर्ण करणे.
१४ आॅगस्ट - सायंकाळी ५ वाजता विशेष फेरीची गुणवत्ता यादी आॅनलाइन जाहीर होईल.
१६ ते १९ आॅगस्ट - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी विशेष फेरीमध्ये अलॉट झालेल्या जागांवर महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चिती करणे.

प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळापत्रक
२० आॅगस्ट - सायंकाळी ५ वाजता पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा जाहीर होणार.
२१ आॅगस्ट - सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या प्रकारातील विद्यार्थी एफसीएफएस पॅनलद्वारे कनिष्ठ महाविद्यालय निवडू शकतील.
२१ व २२ आॅगस्ट - सकाळी १० ते ५ आणि २२ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रथम येणाºया प्रथम प्राधान्यअंतर्गत पॅनलद्वारे मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चिती करणे.
२२ आॅगस्ट - दुसºया प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांच्या रिक्त जागा जाहीर होणार.
२३ आॅगस्ट - सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत दुसºया प्रकारातील विद्यार्थी प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्यअंतर्गत विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालय निवडू शकतील.
२३ व २४ आॅगस्ट - सकाळी १० ते संध्याकाळी ५, २४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्यअंतर्गत पॅनलद्वारे मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जाऊन प्रवेश घेणे.
२४ आॅगस्ट - तिसºया प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांच्या रिक्त जागा जाहीर होणार.
२६ आॅगस्ट - सकाळी १० ते ५ पर्यंत तिसºया प्रकारातील विद्यार्थी प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालय निवडू शकतील.
२६ व २७ आॅगस्ट - सकाळी १० ते ५ आणि २७ आॅगस्टला दुपारी १पर्यंत प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीअंतर्गत मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयातप्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चिती करणे.
२७ आॅगस्ट - सायंकाळी ५ वाजता रिक्त जागांचा तपशील आॅनलाइन जाहीर होणार.

Web Title: Details of the vacant seats for the special round will be announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.