रक्तचंदन तस्करीप्रकरणी आरोपीला कोठडी

By Admin | Published: February 9, 2015 10:39 PM2015-02-09T22:39:43+5:302015-02-09T22:39:43+5:30

नागपूरहून उरणच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरमध्ये सव्वा २ कोटींचे रक्तचंदन गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पकडले आहे.

Detainee detained for raping smuggling case | रक्तचंदन तस्करीप्रकरणी आरोपीला कोठडी

रक्तचंदन तस्करीप्रकरणी आरोपीला कोठडी

googlenewsNext

वावोशी : नागपूरहून उरणच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरमध्ये सव्वा २ कोटींचे रक्तचंदन गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पकडले आहे. याबाबत अधिक तपास करण्यासाठी खालापूर न्यायालयाने कंटेनर चालक व क्लीनर यास एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे रायगड जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अविनाश पाटील यांनी सांगितले.
नागपूरहून रक्तचंदनाचा साठा परदेशात पाठवण्यात येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला लागताच एमएच०४-एमडी ८१९१ या कंटेनरला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर संशयितरीया ताब्यात घेतले असता सव्वा २ कोटींचा रक्तचंदनाचा साठा या कंटेनरमध्ये आढळून आला.
या कंटेनरमध्ये पुणे येथील शिरूळ येथे तांदूळ गोणी भरल्या असून आतमध्ये हा रक्तचंदन साठा कंटेनरमध्ये सापडला असल्याने याबाबत एखादे रॅकेट असल्याचा संशय असल्याने गुन्हे अन्वेषण विभागाचे चार पथक तपास कार्याकरिता तयार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले असून कंटेनरचा चालक तवकीर खान व क्लीनर मनोज पवार या दोघांना खालापूर न्यायालयाने तपासासाठी एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. मध्यंतरी उरण परिसरातही कोट्यवधीचे रक्तचंदन पकडण्यात आले होते. परराज्यातून ही तस्करी होत असल्याचा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.

Web Title: Detainee detained for raping smuggling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.