मोटरसायकलींसह चोर अटकेत

By admin | Published: December 13, 2014 10:36 PM2014-12-13T22:36:38+5:302014-12-13T22:36:38+5:30

गेल्या महिन्यात मनोर येथून चोरी केलेल्या मोटर सायकलचा तपास करणा:या मनोर पोलीसांना सापडले.

Detecting the thief with motorcycle | मोटरसायकलींसह चोर अटकेत

मोटरसायकलींसह चोर अटकेत

Next
मनोर : गेल्या महिन्यात मनोर येथून चोरी केलेल्या मोटर सायकलचा तपास करणा:या मनोर पोलीसांना सापडले. मोटर सायकल चोरी करणारे रॅकेट 16 मोटरसायकलसहीत आरोपी मनोर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आले आहे. त्यास पालघर न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. गुजरात राज्यातुन खुनाचा गुन्हा असलेला फरारी आरोपी पालघर जिल्ह्यात नागझरी येथे मोटरसायकल मॅकेनिक गॅरेज टाकून रोजरोपसणो नवीन को:या मोटरसायकल विक्रीचे काम करीत होता.
मनोर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोर गावात गेल्या महिन्यात राज भोलाराम शोने यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार मनोर पोलीस ठाण्यात दाखल होती. त्या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिक्षक जिल्हा पालघर सुवेज हक, पोलीस उपनिरीक्षक जयंत बजबळे व सहा. पो. नि. मारोती पाटील यांनी आरोपी र्पयत पोहोचण्यासाठी आखणी केली. गुन्ह्याचा छडा लावण्यास सुरूवात केली असता नागझरी येथे मोटरसायकल गॅरेज आहे व तेथील मॅकेनिक मुकेशभाई फकीर भाई पटेल रा. बलसाड गुजरात, हा नवीन मोटरसायकल विक्री करण्याचा धंदा करतो, असे कळाल्यावर त्यास मनोर पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एकुण 17 गाडय़ा हस्तगत करण्यात आल्या आहेत. उर्वरीत  मोटरसायकलीही मिळण्याची शक्यता  आहे. सर्व मोटरसायकल नव्या को:या असून बीना नंबरच्या आहेत. मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.
सहा. पो. नि. मारोती पाटील यांनी लोकमतला माहिती दिली की आरोपी मुकेशभाई फकीरभाई पटेल (26) हा शुखाला ता. कपराडा, जि. बलसाड गुजरात राज्याचा रहिवासी असून त्याच्यावर प}ीच्या खुनाचा गुन्हा गुजरातमध्ये दाखल आहे. तो फरार होता त्यांनी पालघर जिल्ह्यात नागझरी येथे गॅरेज सुरू केले होते. तो गुजरात येथील अट्टल गुन्हेगार आहे. 
(वार्ताहर) 

 

Web Title: Detecting the thief with motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.