नवीन ठाणे स्थानकाच्या जागेसाठी चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:52 AM2018-01-15T02:52:52+5:302018-01-15T02:53:49+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन ठाणे स्थानकाची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाणे-मुलुंड स्थानकांदरम्यान अंतर कमी आहे.
महेश चेमटे
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन ठाणे स्थानकाची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाणे-मुलुंड स्थानकांदरम्यान अंतर कमी आहे. परिणामी येथे स्थानक उभारल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी प्रवाशांचे हालच होतील. या कारणास्तव नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेसाठी पुन्हा चाचपणी करण्याची गरज असल्याचे मत रेल्वेतील वरिष्ठ अधिका-यांनी व्यक्त केले.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी हे मुंबई दौºयावर आले होते. दौºयादरम्यान लोहाणी यांनी उपनगरीय प्रवाशांच्या समस्येबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची सीएसएमटी येथे शुक्रवारी बैठक घेतली. नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी सुमारे १५० कोटींचा खर्च येणार आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून प्रस्तावित ठिकाणी स्थानक उभारत प्रवासी समस्या सुटणार नाही. सद्य:स्थितीत मनोरुग्णालयाच्या जागेवर नवीन ठाणे रेल्वे स्थानक होणार आहे. ठाणे-मुलुंड स्थानकामध्ये स्थानक उभारणे हे तांत्रिकदृष्ट्या देखील शक्य नसल्याचे रेल्वे अधिकाºयांचे म्हणणे आहे. नवीन ठाणे स्थानकासाठी स्थानिकांसह प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे.
बैठकीत नवीन ठाणे रेल्वे स्थानकामागे राजकीय हेतू असल्याची माहिती समोर आली. यामुळे या स्थानकापेक्षा अन्य पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. यामुळे नव्या जागेसाठी पाहणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन ठाणे स्थानकाला पर्याय ठरू शकणाºया पारसिक स्थानकासाठी रेल्वे मंडळ अनुकूल असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
नवीन स्थानकाची गरज ठाणे-मुलुंड येथे नव्हे तर कळवा-मुंब्रा दरम्यान आहे. ठाणे-मुलुंडच्या दरम्यान तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे रेल्वे बोर्डाच्या अधिकाºयांनी दोन्ही जागांची पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई यांनी व्यक्त केले.
नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी ठाणे शहरातील बड्या नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी वजन वापरले़ नवीन स्थानकाची गरज ठाणे-मुलुंड येथे नव्हे तर कळवा-मुंब्रा दरम्यान आहे़ रेल्वे बोर्डाच्या अधिकाºयांनी दोन्ही जागांची पाहाणी करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत रेल्वे प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई यांनी सांगितले़