सोशल मीडियामुळे सामाजिक वातावरणात बिघाड- रतन टाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 04:51 AM2020-06-22T04:51:19+5:302020-06-22T04:51:32+5:30

अशा वातावरणात सर्वांनी परस्परांना सहकार्य करत वाटचाल करण्याची आवश्यकता आहे,

Deterioration in social environment due to social media- Ratan Tata | सोशल मीडियामुळे सामाजिक वातावरणात बिघाड- रतन टाटा

सोशल मीडियामुळे सामाजिक वातावरणात बिघाड- रतन टाटा

Next

मुंबई : इंटरनेटवर समाजमाध्यमांत सुरू असलेल्या चर्चा आणि घडामोडींमुळे समाजातील वातावरण बिघडत आहे. यंदाच्या वर्षी अनेक मोठी आव्हाने आपल्या सर्वांसमोर उभी ठाकली आहेत. अशा वातावरणात सर्वांनी परस्परांना सहकार्य करत वाटचाल करण्याची आवश्यकता आहे, असे प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.
रतन टाटा म्हणाले की, इंटरनेटवर सक्रिय असलेले लोक एकमेकांना मदत करण्याऐवजी दुसऱ्यांचे नुकसान कसे होईल हेच पाहात असतात. दुसऱ्यांना कमी कसे लेखता येईल याचीच चढाओढ इंटरनेटवर सुरू असते. एखाद्या घटनेवर लोक लगेच मत बनवितात आणि मग व्यक्त व्हायला लागतात. एखादी घटना घडल्यावर तिचा सर्व बाजूंनी विचार करून व्यक्त झाल्यास त्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही.
एक-दुसºयाला पाण्यात पाहण्यापेक्षा परस्परांना मदत केल्यास सध्याच्या निर्माण झालेल्या कठीण काळाचा यशस्वीरीत्या मुकाबला करता येईल.
जगामध्ये कोरोनाच्या साथीने हाहाकार माजविला आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून तिथे बेकारीचे प्रमाणही वाढत आहे.

Web Title: Deterioration in social environment due to social media- Ratan Tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.