लोकभारती ‘पदवीधर’च्या रिंगणात, शिवसेनेला पराभूत करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:13 AM2018-05-31T02:13:20+5:302018-05-31T02:13:20+5:30

गेली दोन टर्म मुंबईच्या शिक्षक मतदारसंघात विजयी डंका वाजवणाऱ्या लोकभारती पक्षाने यंदा शिक्षक मतदारसंघासह

The determination to defeat the Shiv Sena in Lokbharati 'Graduadar', in the fray | लोकभारती ‘पदवीधर’च्या रिंगणात, शिवसेनेला पराभूत करण्याचा निर्धार

लोकभारती ‘पदवीधर’च्या रिंगणात, शिवसेनेला पराभूत करण्याचा निर्धार

Next

मुंबई/ठाणे : गेली दोन टर्म मुंबईच्या शिक्षक मतदारसंघात विजयी डंका वाजवणाऱ्या लोकभारती पक्षाने यंदा शिक्षक मतदारसंघासह मुंबईतील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकभारतीचे आमदार कपिल यांनी बुधवारी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पदवीधर मतदारसंघासाठी लोकभारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
याआधी मुंबईच्या शिक्षक मतदारसंघातून सलग दोन टर्म निवडून येणाºया कपिल पाटील यांना लोकभारतीने पुन्हा एकदा तिसºयांदा उमेदवारी दिली आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षांविरोधात लोकभारती पुन्हा एकदा सहज विजय मिळवेल, अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील यांनी व्यक्त केली. गतवेळच्या निवडणुकीत एकट्या लोकभारतीने तब्बल ६० टक्क्यांहून अधिक मते मिळवली होती. तीच परंपरा यंदा कायम राखू, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
यंदा प्रथमच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढत असलो, तरी विजय आमचाचा असल्याची प्रतिक्रिया जालिंदर सरोदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पदवीधरांचे प्रश्न मांडणारा आणि पदवीधरांना माहिती असलेला उमेदवार कोणत्याही पक्षाकडे नाही. याआधी साटेलोटे करून पारंपरिक मतदारसंघ केलेल्या शिवसेनेला यंदा पराभूत करू. आमच्याकडील १०० टक्के पदाधिकारी हे पदवीधर आहेत. मोठ्या संख्येने लोकभारतीने नोंदणी केली असून, प्रत्येक पदवीधराचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक पक्षाकडे आहे. त्यामुळे यंदा शिक्षक मतदारसंघासह पदवीधर मतदारसंघावरही लोकभारतीचाच झेंडा फडकण्याचा दावा सरोदे यांनी व्यक्त केला.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी ३१ मेपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे सुरू होत आहे. हे अर्ज ७ जूनपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सामान्य प्रशासन) बेलापूर, कोकण भवन येथे पहिल्या मजल्यावर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वीकारणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले आहे. अर्जांची छाननी ८ जून रोजी होऊन ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २५ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २८ जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येईल. विभागीय आयुक्त हे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, तर उपायुक्त (सामान्य प्रशासन) ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तसेच या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, त्याचे काटेकोर पालन करण्याचे आव्हानदेखील त्यांनी केले आहे.

Web Title: The determination to defeat the Shiv Sena in Lokbharati 'Graduadar', in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.