Join us

मराठी विषयाची गुणवत्ता वाढविण्याचा निर्धार; ३०० शाळांमधील शिक्षक एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 6:51 PM

दहावीच्या पेपर्स पॅटर्न मध्ये यंदापासून बदल झाला असून शाळेतर्फे देण्यात येणारे अंतर्गत गुण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शंभर गुणांचा मराठी भाषेचा पेपर विद्यार्थ्यांना सोडवावा लागणार आहे.

मुंबई: दहावीच्या पेपर्स पॅटर्न मध्ये यंदापासून बदल झाला असून शाळेतर्फे देण्यात येणारे अंतर्गत गुण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शंभर गुणांचा मराठी भाषेचा पेपर विद्यार्थ्यांना सोडवावा लागणार आहे. या बदललेल्या पॅटर्न मध्ये मराठी विषयात विद्यार्थ्यांनी स्कोरिंग करण्याचा निर्धार मुंबईतील ३०० शाळांमधील मराठी विषय शिक्षकांनी केलामहाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मुंबई विभागाने मराठी विषय शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या उद् बोधन वर्गाची सुरुवात काल उत्तर विभागातून करण्यात आली.  काल घाटकोपर येथील विद्याभवन हायस्कुलमध्ये उत्तर विभागातील १५० व आज खार येथील अनुयोग विद्यालयात पश्चिम विभागातील १५० शाळांमधील शिक्षकांना अध्यापक संघाचे विजयकुमार लांडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे, अनुयोग विद्यालयाचे संस्थापक सतिशचंद्र चिंदरकर, मनीषा घेवडे,शिक्षण उपनिरीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होतेयावेळी लांडगे यांनी दहावीच्या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनमधील पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरातलेखन, बातमीलेखन, कथालेखन, लेखन कौशल्य, रसग्रहण व रुपककथेचे स्वरूप शिक्षकांना समजावून सांगितले. औपचारिक व अंनोपचारिक पत्रांमधील फरक, सारांशलेखनातील महत्वाचे मुद्दे, जाहिरात लेखन करतांना विचारात घ्यावयाच्या सूचना, बातमीलेखनाचे तंत्रे, कथालेखनाचे प्रकार, रसग्रहण, निबंधलेखन यासह अन्य मुद्यांवर शिक्षकांना मार्गदर्शन करून शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले.शिक्षकांनी अध्यापन करतांना विविध संदर्भांचा आधार घ्यायला हवा त्यासाठी शिक्षकांनी अधिकाधिक संदर्भ पुस्तके वाचायला हवी व अपडेट राहायला हवे असे आवाहन मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षकांना केले.

ठाणे नवी मुंबईत जानेवारी मध्ये वर्गठाणे व नवी मुंबईतील शिक्षकांसाठी पुढील महिन्यात मराठी विषयाचे उद् बोधन वर्ग आयोजित करण्यात येणार असून सुमारे पाचशे शाळांमधील शिक्षक यामध्ये सहभागी होणार असल्याचे मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले

टॅग्स :मराठीशाळा