कचरामुक्तीचा निर्धार

By admin | Published: April 1, 2017 06:39 AM2017-04-01T06:39:53+5:302017-04-01T06:39:53+5:30

कचरा समस्या भीषण स्वरूप घेत असून मुंबईची कचराकुंडी होण्याची वेळ आली आहे. कचरा पुनर्प्रक्रिया, कचराभूमीचे

Determination of waste | कचरामुक्तीचा निर्धार

कचरामुक्तीचा निर्धार

Next

मुंबई : कचरा समस्या भीषण स्वरूप घेत असून मुंबईची कचराकुंडी होण्याची वेळ आली आहे. कचरा पुनर्प्रक्रिया, कचराभूमीचे संपादन आणि बेस्ट आऊट आॅफ वेस्ट असे उपक्रम घेऊन शहराला कचरामुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईत दररोज सुमारे नऊ हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. मात्र देवनार आणि कांजूरमार्ग हे दोनच कचराभूमीचे पर्याय महापालिकेपुढे आहेत. म्हणून कचरा समस्या पेटली आहे. त्यामुळे कांजूर कचराभूमीवर १५ एप्रिलपासून प्रतिदिन आणखी एक हजार मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील अतिरिक्त ५२.५ हेक्टर सीआरझेड हा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी सल्लागारांची नेमणूक करून प्रकल्प आराखडा व निविदेचे कागदपत्र तयार करण्यात येत आहे.
देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. तर मुलुंड कचराभूमीवर २४ हेक्टर जागा मोकळी करण्यासाठी सध्या असलेल्या सात दशलक्ष मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

दोन कचराभूमींचा लागला शोध
कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी तळोजा, करवले येथे ५२.१० हेक्टर जागा व मुलुंड पूर्व येथे ऐरोली ब्रिजजवळ ३२.७७ हेक्टर जागा पालिकेस मिळाली आहे. या जागेचे सर्वेक्षण व संपादन करण्याचे काम सुरू आहे. पर्यावरण मंजुरी, सागरी किनारा नियामक क्षेत्र मंजुरी आदींसह पर्यावरण सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्राप्त झाल्या आहेत.
एक हजार मेट्रिक टन कचरा प्रक्रिया सुविधा विकसित करण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत. यासाठी दीडशे कोटींची तरतूद आहे.

Web Title: Determination of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.