Join us

डॉक्टरांच्या कामाचे तास ठरवा - मार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 4:44 AM

राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवर कामाच्या असणाऱ्या ताणामुळे डॉक्टरांच्या स्वास्थ्यावरही परिणाम होतो आहे.

मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवर कामाच्या असणाऱ्या ताणामुळे डॉक्टरांच्या स्वास्थ्यावरही परिणाम होतो आहे. त्यामुळे बºयाचदा डॉक्टरांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यही बिघडत असल्याचे दिसून येते. यावर उपाय म्हणून कामाचे तास ठरवून द्या, अशी मागणी करणारे पत्र निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने वैद्यकीय शिक्षण आणि संचालनालयाकडे पाठवले आहे.निवासी डॉक्टरांना बºयाचदा २४ ते ३६ तासही काम करावे लागते. त्यात खाण्या-पिण्याची वेळ निश्चित नसते. शिवाय, कामाच्या ताणामुळे झोपही पूर्ण होत नाही. त्यामुळे या वेळेची निश्चिती करण्याचा विचार करावा, असे पत्रात नमूद आहे. निवासी डॉक्टरांच्या वेगवेगळ्या समस्यांचा समावेशही पत्रात आहे.