मुंबई विकासाचा दशकाचा आराखडा तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:43 AM2018-02-21T02:43:26+5:302018-02-21T02:43:32+5:30
मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून तो पुढील दशकासाठी दिशादर्शक असेल, असे मत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले.
मुंबई : मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून तो पुढील दशकासाठी दिशादर्शक असेल, असे मत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले.
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स परिषदेत ‘मुंबई - द फायन्शिअल हब : द वे अहेड’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, कोटक इंडस्ट्रीज्चे उदय कोटक, मधुर देवरा, लिओ पुरी, शिखा शर्मा, टी. रामचंद्रन आणि संदीप गुरुमुर्थी आदींनी सहभाग घेतला.
श्रीनिवास या वेळी म्हणाले, येणाºया नवीन विकास आराखड्यामध्ये मुंबईतल्या प्रत्येक बाबीचा अभ्यास करण्यात आला आहे. आगामी काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे यावर राज्य शासनाचा भर असणार आहे.
२१ प्रकल्पांच्या मॉनिटरिंगसाठी वॉर रूम
कौस्तुभ धवसे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रमुख २१ प्रकल्पांचे मॉनिटरिंग करण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूम सुरू केली आहे. आगामी काळात त्याचे लाइव्ह मॉनिटरिंग करण्याबरोबरच हे सगळे डॅशबोर्डवरही घेतले जाणार आहे. टी. रामचंद्रन म्हणाले, आगामी काळात महिलांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील सहभाग वाढणे आवश्यक असून यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
थेट परकीय गुंतवणुकीचे महत्त्वाचे प्रकल्प
कॅरियर मीडिया इंडिया प्रा. लि. - ३०० कोटी
एमर्सन प्रोसेस मॅनेजमेंट - ८१५ कोटी
आयएलजीआयएन ग्लोबल इंडिया - ७५० कोटी
एलजी इलेक्ट्रॉनिक्स - ३५० कोटी
ओव्हन्स कॉर्निंग इंडिया - १०५० कोटी
पेरी विर्क ७२५ कोटी.