स्मार्ट शहरे विकसित करणार - मुख्यमंत्री
By admin | Published: August 5, 2016 03:50 AM2016-08-05T03:50:36+5:302016-08-05T03:50:36+5:30
राज्यातील शहरे डिजिटल स्मार्ट सिटी करण्यासंदर्भात राज्य शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग व हेवलेट पॅकर्ड इंटरप्रायझेस यांच्यात गुरुवारी विधानभवनात सामंजस्य करार करण्यात आला
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील शहरे डिजिटल स्मार्ट सिटी करण्यासंदर्भात राज्य शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग व हेवलेट पॅकर्ड इंटरप्रायझेस यांच्यात गुरुवारी विधानभवनात सामंजस्य करार करण्यात आला. शहरे स्मार्ट व डिजिटल क्षमतेची करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याअंतर्गत दहा शहरे स्मार्ट सिटीअंतर्गत विकिसत करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी राज्य शासनाच्या वतीने माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम व हेवलेटच्या वतीने उपाध्यक्ष सोम सत्संगी यांनी करारावर स्वाक्षरी केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील हेवलेट पॅकर्ड ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कराराअंतर्गत अमरावती, औरंगाबाद व नाशिक ही ‘स्मार्ट शहरे’ करण्यासाठी ही कंपनी तांत्रिक सहाय्य व भांडवल पुरविणार आहे. (विशेष प्रतिनिधी)