मुंबई - तळोजा येथील प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्ह्यात मे. सुप्रिम डेव्हलपर्स प्रा. लि. चे ललित शाम टेकचंदानी यांच्यावर अटकेची कारवाई केली. आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी चौकशीअंती कारवाई केली आहे.
चेंबूर येथील हिरा जाधवानी यांच्या तक्रारीनुसार एकंदरीत मे. सुप्रिम डेव्हलपर्स प्रा. लि. चे ललित शाम टेकचंदानी, काजल ललित टेकचंदानी,अरूण माखीजानी, मनुल्ला मेहबुल्ला कांचवाला, मिर्झा मोहंमद नुरुल हसन इब्राहीम व इतर मे. सुप्रिम डेव्हलपर्स प्रा. लि. चे आजी-माजी संचालक, भागीदार व प्रमोटर्स यांनी त्यांच्या तळोजा येथील प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली ७३ लाख ६० हजार रुपये घेवून घराचा ताबा दिला नसल्याचा आरोप केला आहे. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.