Join us

विकासक, कंपन्या, मोठ्या मॉल्सच्या मालकांनी महापालिकेचा १३३ कोटी मालमत्ता कर थकविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 2:51 AM

मुंबई : मुंबईतील विकासक, कंपन्या, मोठ्या मॉल्सच्या मालकांनी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. यामध्ये निर्मल लाइफ स्टाइल, फिनिक्स मिल, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो अशा सुमारे शंभर थकबाकीदारांचा समावेश आहे.

मुंबई : मुंबईतील विकासक, कंपन्या, मोठ्या मॉल्सच्या मालकांनी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. यामध्ये निर्मल लाइफ स्टाइल, फिनिक्स मिल, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो अशा सुमारे शंभर थकबाकीदारांचा समावेश आहे.जकात कर बंद झाल्याने मालमत्ता कर हाच पालिकेसाठी उत्पन्नाचा सर्वांत मोठा स्रोत उरला आहे. या कराच्या माध्यमातून येणाºया उत्पन्नावरच मुंबईतील विकासकामे शक्य होणार आहेत. मात्र अनेक मोठ्या विकासकांनी, कंपन्यांनी, मॉल मालकांनी पालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे. अशा मोठ्या थकबाकीदारांची यादी सादर करावी, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळ) नर यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे सोमवारी केली.या मोठ्या थकबाकीदारांकडून सुमारे १३३.२५ कोटी पालिकेला येणे आहे. प्रत्यक्षात ही संख्या खूप मोठी असू शकते. त्यामुळे मालमत्ता कर खात्याच्या एकूणच कार्यपद्धतीचा आढावा घेऊन थकबाकी थकवण्यामागची कारणे प्रशासनाने शोधून थकबाकी वसुलीसाठी कोणत्या उपाययोजना केल्या याचा अहवाल द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.>हे आहेत काही थकबाकीदारआस्थापनेचे नाव थकीत रक्कम(कोटीमध्ये)लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो ५.४७एचडीआयएल २.३७फिनिक्स मिल १.५५अपोलो मिल २.८५निर्मल लाइफ स्टाइल ५.२१क्राऊन मिल ६.००सहारा हॉटेल २.९२कोहिनूर प्लॅनेट २.६९अन्य थकबाकीदार १३३.२५