Join us  

विकास आराखड्यातून आरे कॉलनीला सूट?

By admin | Published: July 09, 2015 9:52 PM

विकास आराखड्यातून आरे कॉलनीला सूट?

विकास आराखड्यातून आरे कॉलनीला सूट?
मोकळा श्वास मिळण्याचे संकेत
अजय मेहतांची सावध भूमिका
मुंबई: मुंबईतील मोठा हरितप˜ा म्हणजेच गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी परिसर विकासासाठी खुले करण्याचे समर्थन तत्कालिन आयुक्त सीताराम कुंटे यांना चांगलेच महागात पडले़ यातून धडा घेऊन विद्यमान आयुक्त अजय मेहता यांनी सावध भूमिका घेतली आहे़ त्यामुळे सुधारित विकास आराखड्यातून आरे कॉलनीला मोकळा श्वास मिळण्याचे संकेत आहेत़
सुमारे तीन हजार एकरवर वसलेले आरे कॉलनी परिसर आत्तापर्यंत बांधकाममुक्त होते़ मात्र मेट्रो कारशेड, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता अशा अनेक विकास प्रकल्पांमध्ये या हरित प˜्याला धोका निर्माण झाला आहे़ त्यातच आत्तापर्यंत ना विकास क्षेत्रात असलेल्या आरे कॉलनीचे द्वार सन २०१४-२०३४ या विकास आराखड्यातील शिफारशींमुळे विकासासाठी खुले करण्यात आले़
याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असताना तत्कालिन आयुक्त कुंटे यांनी या आरक्षणावर ठाम राहत रोष ओढावून घेतला़ असंख्य त्रुटीमुळे या आराखड्याला राज्य सरकारने स्थगिती देत सुधारणा करण्याची मुदत दिली़ त्यानुसार ऑगस्ट अखेरीस सुधारित आराखडा सादर होणार आहे़ परंतु यावेळीस नागरिकांच्या सूचनांचा विचार करुन आराखडा तयार होईल, असे संकेत आयुक्त मेहता यांनी दिले आहेत़ (प्रतिनिधी)
...........................
(चौकट)
हरित प˜्यांवरील घोंघावते संकट
* आरे कॉलनीमधून गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता जाणार आहे़ या प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगर जोडले जाऊन मुंबईकरांचा प्रवास जलद व सुकर होणार आहे़ मात्र या प्रकल्पात काही वृक्षांची कत्तल होण्याचा धोका व्यक्त होत होता़
* मुंबई मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीची जागा देण्यात येणार होती़ यामुळे सुमारे दोन हजार वृक्षांना धक्का बसणार होता़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्याने अखेर या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती़अद्याप हा वाद संपलेला नाही़
* पुढील २० वर्षांमध्ये शहराच्या विकासाचे नियोजन करताना आरे कॉलनी विकासासाठी खुली करण्यात आली़ मात्र यामुळे बिल्डरांचा फायदा होणार, अतिक्रमण वाढणार, हा विकास नव्हे विनाश असल्याचा संताप पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत़ यात कचरा वर्गीकरण केंद्राच्या आरक्षणाने भर घातली आहे़
.............................
कुंटेंचे ते वादग्रस्त विधान...
विकास न झाल्यास दुसरी धारावीच आरे कॉलनीत वसेल, असे वादग्रस्त विधान तत्कालिन आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले होते़ त्यांची तडकाफडकी बदली होण्यास हे विधानही कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते़