Join us

धोकादायक क्षेत्राला विकासाचा सुरुंग

By admin | Published: April 11, 2015 1:51 AM

दक्षिण मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी उपनगरातील प्रमुख स्थानकांवरच बीकेसीच्या धर्तीवर वाणिज्य संकुलांचा विकास आराखड्यातून प्रस्तावित करण्यात आला

शेफाली परब-पंडित, मुंबईदक्षिण मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी उपनगरातील प्रमुख स्थानकांवरच बीकेसीच्या धर्तीवर वाणिज्य संकुलांचा विकास आराखड्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. परंतु रासायनिक आणि औद्योगिक वसाहतींमुळे गेली दोन दशके प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या चेंबूर ते कुर्ल्यापर्यंतच्या ४५ लाख रहिवाशांची डोकेदुखी यातून वाढली आहे़ डम्पिंग ग्राउंड, अणुसंशोधन केंद्र, औद्योगिक वसाहतींमुळे धोकादायक क्षेत्र ठरलेल्या या पट्ट्यामध्ये आणखी विकास म्हणजे घातच असल्याचा संतप्त सूर उमटू लागला आहे़देवनार डम्पिंग ग्राउंड, माहुल येथील तेल कंपन्या, ट्रॉम्बेचे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र, गोवंडी येथील जैविक कचरा व्यवस्थापन केंद्रामुळे पूर्व उपनगरातील हा पट्टा म्हणजे टाइम बॉम्बच समजला जातो़ मात्र नवीन आराखड्यात स्थानिक प्रयोजनासाठी विकास (ट्रॉन्झिट आॅरिएन्टेड डेव्हलपमेंट) अशी तरतूद करण्यात आली आहे़ मात्र एकप्रकारे टाइम बॉम्बच ठरलेल्या या पट्ट्याच्या सुरक्षेबाबत आराखडा मूक आहे़या डेंजर झोनचा विचार विकास आराखड्यातून होण्याची मागणी रहिवासी व संघटनांनी पालिकेच्या विभागस्तरावरील कार्यशाळेमध्ये केली होती़ त्यानुसार या धोकादायक पट्ट्याला दिलासा देण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन आखला जाईल, अशी रहिवाशांना आशा होती़ परंतु तसे न झाल्याने पर्यावरणवादी, बिगर शासकीय संस्थांकडून व्यक्त होत आहे़