Join us

फिल्मसिटीचा विकास खासगी सहभागातून; निविदा निघाली

By यदू जोशी | Published: October 10, 2018 2:30 AM

गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा मेकओव्हर करण्यात येणार असून हॉलीवूडला टक्कर देणारी बॉलिवूडची भव्यदिव्य अशी फिल्मसिटी खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे.

मुंबई : गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा मेकओव्हर करण्यात येणार असून हॉलीवूडला टक्कर देणारी बॉलिवूडची भव्यदिव्य अशी फिल्मसिटी खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे. २६०० कोटींच्या या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली असून थीमपार्कसह अनेक आकर्षणे येथे असतील.फिल्मसिटी जगभरातील पर्यटकांचे आकर्षणकेंद्र ठरावे, या दृष्टीने दिमाखदार प्रकल्पांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. बॉलिवूड म्युझियम, थीम पार्क, अत्याधुनिक स्टुडिओ, विविध प्रॉडक्शन हाऊसेसची कार्यालये, तारांकित हॉटेल्स, डमी शूटिंग सेंटर, आऊटडोअर शूटिंग सेंटर आदी या ठिकाणी असेल. या प्रकल्पांसाठी राज्य शासन जमीन देईल आणि त्या मोबदल्यात सरकारला वार्षिक उत्पन्न मिळेल.फिल्मसिटीची जमीन २८० एकर आहे. त्यातील बांधकामयोग्य जमीन २२० एकर आहे. फिल्मसिटीचा प्रकल्प बिल्डरधार्जिणा होऊ नये, यासाठी या प्रकल्पात चित्रपट क्षेत्राचा अनुभव असलेल्या कंपनीची गुंतवणूक ही किमान २६ टक्के इतकी असावी, ही अट ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई