मुंबई : मोदी सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही, त्यामुळे वर्षपूर्तीनिमित्त २६ मे रोजी सरकारची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे, असे सांगत महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गुजरातला नेले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.खा. चव्हाण म्हणाले, पेट्रोल-डिझेल, गॅस स्वस्त केला जाईल, १०० दिवसांत काळा पैसा देशात परत आणला जाईल, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा होतील, औषधे स्वस्त होतील, वर्षभरात अडीच कोटी नोकऱ्या देऊ, पाकिस्तान एक मारेल तर आम्ही त्यांचे दहा मारू, चीनला वठणीवर आणू , अशा असंख्य घोषणा नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारात केल्या होत्या. मात्र, वर्ष संपले तरी एकाही आश्वासनाची पूर्तता मोदी सरकारने केली नाही. शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडून हे सरकार उद्योगांच्या पाठीशी उभे राहत आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा आणून या सरकारने चर्मकार, मागासवर्गीय, औषध कंपन्यांना अडचणीत आणले आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे राज्यभर सरकारची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मोर्चे, निर्दशने, सभा असे विविध कार्यक्रम होतील, असे खा. चव्हाण यांनी सांगितले. निरीक्षकाचा फतवा आणि बदलीनमाजच्यावेळी मस्जिदमध्ये असणाऱ्या मौलानांनी शासनाच्या गोवंश हत्याबंदीच्या विरोधात बोलू नये, असा फतवा नांदेडच्या एका पोलीस निरीक्षकाने काढला. नंतर त्या निरीक्षकाने माफी मागितली, त्याची बदलीही झाली. पण गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे राज्यावर किती नियंत्रण आहे, हे दिसून येते, असेही ते म्हणाले.च्डॉ. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ संपला त्यादिवशी कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत ११० डॉलर तर पेट्रोलची किंमत ८० रुपये होती. च्आता क्रुड आॅईलचा बॅरल ६६ डॉलरमध्ये मिळत असताना पेट्रोलचे भाव तब्बल ७५ रुपये आहेत. वर्षभरात कु्रड आॅईल ४४ डॉलरने स्वस्त झाले असताना पेट्रोल व डिझेलच्या दरात फक्त ५ रूपयांचीच कपात केली गेली.च्मागील वर्षी मे महिन्यात तूरडाळीचे भाव ५८०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल होते. मागील आठवड्यात हे भाव ९५०० ते १०५०० वर जाऊन पोहोचले. च्गतवर्षीच्या तुलनेत गव्हाच्या भावात क्विंटलमागे ८० ते ३०० रुपयांनी तर ज्वारीच्या भावात ५० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. च्मोदींनी पुढील १० वर्षांत २५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्या वर्षी २.५ कोटी रोजगार निर्मिती होणे अपेक्षित होते. परंतु लेबर ब्युरोच्या सर्वेक्षणानुसार सर्वात मोठ्या ८ क्षेत्रांमध्ये आॅक्टोबर २०१४ ते डिसेंबर २०१४ या तिमाहीत १.१७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली. पवारांचे कोण ऐकते ? : शरद पवार जे सांगतात त्या गोष्टी त्यांच्याच पक्षाचे नेते ऐकत नाहीत, असा टोला चव्हाण यांनी लगावला.
महाराष्ट्राचा ऱ्हास, गुजरातचा विकास!
By admin | Published: May 23, 2015 1:44 AM