निवडणुकीत लटकला आराखड्याचा विकास

By admin | Published: December 23, 2016 03:46 AM2016-12-23T03:46:55+5:302016-12-23T03:46:55+5:30

शहरात झपाट्याने बदल होत असताना विकासाला दिशा देणारा आराखडा मात्र लटकला आहे. अनेक त्रुटी व शिफारशींमुळे वादग्रस्त

Development of the hanging in the elections | निवडणुकीत लटकला आराखड्याचा विकास

निवडणुकीत लटकला आराखड्याचा विकास

Next

मुंबई : शहरात झपाट्याने बदल होत असताना विकासाला दिशा देणारा आराखडा मात्र लटकला आहे. अनेक त्रुटी व शिफारशींमुळे वादग्रस्त ठरलेला हा आराखडा अडचणीत आणू शकतो. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने २०१४ ते ३४ चा विकास आराखडा पुन्हा एकदा लांबणीवर टाकलो. सुधारित आराखडा राज्य सरकारला सादर करण्यास ७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी महापालिका सभागृहात मंजुरी दिली.
विकास आराखड्यावरील हरकती-सूचनांवर सुनावणी करणाऱ्या समितीने सुनावणीनंतर फेरबदल व शिफारशींच्या कामासाठी
दिलेली मुदत १५ जानेवारी २०१७ रोजी संपणार आहे, त्यामुळे ७ मार्चपर्यंत ही मुदतवाढ देण्याची मागणी कोली होती. आराखड्यात फेरबदल व शिफारशी आवश्यक असल्याने ही मुदतवाढ करावी, असा प्रस्ताव सभागृहात सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Development of the hanging in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.