खुंटला कोपरी पाचपाखाडीकरांचा विकास
By admin | Published: September 2, 2014 11:16 PM2014-09-02T23:16:33+5:302014-09-02T23:16:33+5:30
ठाणो शहर विधानसभा मतदार संघालाच लागून असलेला मतदार संघ म्हणून कोपरी पाचपाखाडी या मतदार संघाकडे पाहिले जाते.
Next
अजित मांडके - ठाणो
ठाणो शहर विधानसभा मतदार संघालाच लागून असलेला मतदार संघ म्हणून कोपरी पाचपाखाडी या मतदार संघाकडे पाहिले जाते. परंतु, एमआयडीसी आणि वन विभागाच्या जागेवरील झोपडपट्टय़ांमुळे हा मतदार संघ नेहमी चर्चेत राहिला आहे. राजकीय नेत्यांनी मात्र या झोपडपट्टीवासीयांच्या विकासाच्या नावाखाली गेली कित्येक वर्षे आपली पोळी भाजण्याचे राजकारण केले. परंतु प्रत्यक्षात एमआयडीसी अथवा वन विभागाच्या जागेवरील रहिवाशांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट अथवा विकासाचे मॉडेल एकाही पक्षाला देता आलेले नाही. येथील रहिवाशांचा केवळ आंदोलनासाठीच वापर होत असून प्रत्यक्षात येथील समस्या या गेल्या कित्येक वषार्ंपासून तशाच राहिल्या आहेत.
कोपरी -पाचपाखाडी या मतदार संघात ठाणो पूर्वचा भाग, कोपरी गाव, पूव्रेचा स्टेशन परिसर, वागळे, तीन हात नाक्याचा परिसर, किसननगर, येऊरचा पायथा, श्रीनगरचा काही भाग, औद्योगिक क्षेत्रचा भाग आदी महत्त्वाच्या भागांचा यात समावेश आहे. स्टेशन परिसरात खाजगी बसेसची होणारे अनधिकृत पार्किग, वाहतूककोंडी यामुळे येथील रहिवासी गेल्या कित्येक वर्षापासून हैराण आहेत. येथील वाहतूककोंडीं मोडीत काढण्यासाठी सॅटीस प्रकल्पाचा नारळ फोडला गेला आहे. सध्या हा प्रकल्प पालिकेच्या कागदावरच आहे.
दुसरीकडे कोपरी गाव, आणि पुढे वागळे, इंदिरानगर, किसननगर, डोंगराळ परिसर येथे झोपडपट्टीमध्ये राहणा:या रहिवाशांचे वास्तव्य अधिक आहे. एमआयडीसीच्या जागेवर 23 झोपडपट्टय़ा असून यामध्ये 3क् हजार झोपडय़ांचा समावेश आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा गाजत आहे. चार वषार्ंपूर्वी एमआयडीसीने येथील झोपडय़ांचे सव्रेक्षण केले होते. त्याचा अहवालही तयार झालेला आहे. परंतु, त्यानंतर प्रत्यक्षात पुनर्वसनाची प्रक्रिया ही कागदावरच आहे. एमआयडीसी हे स्वतंत्र प्राधिकरण असल्याने महापालिकासुध्दा यामध्ये फारशी हस्तक्षेप करीत नाही. परंतु, तरीदेखील येथील रहिवाशांना पाणी, वीज आदींसह मूलभूत सोयीसुविधा देण्याचे काम पालिका करीत आहे. परंतु, या सुविधादेखील अपु:या असून, मलनि:सारणाची समस्या, शौचालयांची दुरवस्था, पाण्याची समस्या, याशिवाय पायाभूत सुविधांचाही अभाव रहिवाशांना भेडसावत आहे.
नगरसेवक निधीतून पायवाटा, गल्ली दुरुस्ती, गटारे, छोटे रस्ते आदी कामे केली जात असली तरी वारंवार याची खोदाई होत असल्याने घरांची उंची ही रस्त्यांच्या खाली गेली आहे. त्यामुळे येथील रहिवासी आणखीनच त्रस्त झाला आहे. दुसरीकडे या मतदारसंघाकडे एक सांस्कृतिक केंद्र म्हणूनही पाहिले जात आहे. परंतु प्रत्यक्षात येथे सांस्कृतिक स्वरुपाचे एकही व्यासपीठ उपलब्ध नाही. कोपरी आणि वागळे भागात असलेली दोन मैदाने वगळता येथील क्रीडाप्रेमींसाठी एकही मोठे खेळाचे मैदानसुध्दा उपलब्ध नाही.
एका बाजूला ठाण्याचा भाग म्हणून याकडे पाहिले जात असले तरी ठाण्याच्या मुख्य भागासाठी मेट्रो, रिंगरुट, एलआरटी, बीआरटीएस आदी स्वरुपाचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. परंतु, हा मतदार संघ वन विभाग आणि एमआयडीसीच्या क्षेत्रने व्यापला गेल्याने नव्याने निर्माण होणा:या सोयीसुविधांचा येथील एकाही नागरिकाला फायदा होणार नाही. विशेष म्हणजे नव्याने जाहीर झालेल्या क्लस्टर योजनेचाही लाभ कोपरी, किसननगर, शिवाजी नगर वगळता इतर भागांना त्याचा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणोकरांना सेवा देण्यास कमी पडलेल्या परिवहन सेवेचे आगारही याच मतदार संघात आहे. परंतु, तरीदेखील येथील रहिवाशांना परिवहनच्या बसेससाठी ठाणो स्थानकात तासन् तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. बसेसची संख्या वाढविण्यासाठी वारंवार आंदोलने झाली. परंतु, अद्यापही या आंदोलनाची दखल ना परिवहनने घेतली, ना राजकीय नेत्यांनी घेतली.