तानाजी मालुसरेंच्या समाधीस्थळाचा विकास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:20 PM2024-03-06T14:20:50+5:302024-03-06T14:21:10+5:30

पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५४ व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. 

Development of Tanaji Malusare's mausoleum, Chief Minister Eknath Shinde's announcement | तानाजी मालुसरेंच्या समाधीस्थळाचा विकास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

तानाजी मालुसरेंच्या समाधीस्थळाचा विकास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे. तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळ्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, म्हणून ऐतिहासिक स्थळांचा, गावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जाहीर केले.

पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५४ व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (ऑनलाइन), उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे आदी उपस्थित होते.

यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभिकरण, समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकाम, बुरुजाचे बांधकाम, प्रसाधनगृहे, अंतर्गत रस्ते काँक्रीट गटार, कंपाउंड वॉलचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत.
 
Web Title: Development of Tanaji Malusare's mausoleum, Chief Minister Eknath Shinde's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.