विकास आराखड्याचा डेझिग्नेशन सर्व्हे उपलब्ध
By admin | Published: November 8, 2015 02:47 AM2015-11-08T02:47:41+5:302015-11-08T02:47:41+5:30
प्रस्तावित ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४’ बाबत महापालिकेच्या संबंधित खात्याद्वारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात नामनिर्देशन सर्वेक्षण (डेझिग्नेशन सर्व्हे) करण्यात
मुंबई : प्रस्तावित ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४’ बाबत महापालिकेच्या संबंधित खात्याद्वारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात नामनिर्देशन सर्वेक्षण (डेझिग्नेशन सर्व्हे) करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी त्यांची निरीक्षणे ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर (होम पेजवर) डाव्या हाताला असणाऱ्या उभ्या रकान्यात (कॉलममध्ये) सर्वात खाली प्रस्तावित ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४-२०३४’ बाबतची विविध माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत असणाऱ्या पहिल्या ‘लिंक’वर अर्थात ‘प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४-२०३४’ यावर क्लिक केल्यानंतर जे पान उघडते त्यावरील ११ क्रमांकाच्या मुद्द्यांतर्गत डेझिग्नेशन सर्व्हे २०३४ ही लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर मुंबई शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगर या लिंक दिसतात. त्यानुसार प्रत्येक लिंकवर क्लिक केल्यास महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची विभागनिहाय माहिती उपलब्ध होते.पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या नामनिर्देशन सर्वेक्षणासंबंधी माहिती ‘पीडीएफ फाइल’मध्ये संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत नागरिकांची काही निरीक्षणे असल्यास त्यांनी ती येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत महापालिकेच्या विकास नियोजन या खात्याला कळवावयाची आहेत. ही निरीक्षणे ई-मेलद्वारे ीी.स्रि१.ेूॅे@ॅें्र’.ूङ्मे या पत्त्यावर कळवावयाची आहेत. (प्रतिनिधी)
संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
विकास आराखड्यात असंख्य चुका झाल्याचे आरोप करत सामाजिक कार्यकर्ते, वास्तुविशारद, वाहतूक तज्ज्ञ आणि पर्यावरणवाद्यांनी महापालिकेला धारेवर धरले होते.
आराखड्यातील चुकांबाबत राजकीय पक्षांनी आवाज उठविल्याने महापालिकेची गोची झाली. परिणामी आरक्षणासह उर्वरित मुद्द्यांवरून महापालिकेवर ताशेरे ओढले गेले. त्यानंतर कुठे महापालिकेने सुधारित विकास आराखड्याचे कामकाज हाती घेतले.
निरीक्षणे पत्राने कळविण्यासाठी पत्ता
प्रमुख अभियंता (विकास नियोजन) ५ वा मजला, नवीन विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग,
फोर्ट, मुंबई - ४००००१
विकास आराखड्यात बंद कापड गिरण्यांच्या जमिनींवर विविध आरक्षणे लादण्यात आल्याने या जमिनींवर घरे उभारण्यात म्हाडाला अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत म्हाडाने महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
- महापालिकेने विकास आराखड्यातील चुका दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे.
- कामाचे एकूण चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.
- एका टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
- तीन टप्प्यांचे काम प्रगतिपथावर आहे.
- सुधारित विकास आराखड्याची डेडलाइन १६ फेब्रुवारी २०१६ ही आहे.
- चुका दुरुस्त करणे, रस्ते, डीसीआर आणि आरक्षण अशा चार टप्प्यांत हे काम
सुरू आहे.
विकास आराखड्याचे काम किती झाले असून, त्यात काय काय सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्याचा आढावा लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे मागितला.
प्रशासनाने यावर विकास आराखड्यावर दाखल झालेल्या ६५ हजार सूचना व हरकतींचे संगणकीकरण हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.
धोरणात्मक बाबींची शहानिशा सुरू असून, आराखड्यातील मुद्द्यांच्या विश्लेषणाचे काम सुरू आहे.
वॉर्डनुसार, रस्त्यांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. रस्त्यांचे निरीक्षणही करण्यात येत आहे.