लोकसहभागातून ग्रामपंचायतींचा विकास आराखडा
By admin | Published: August 20, 2015 12:35 AM2015-08-20T00:35:20+5:302015-08-20T00:35:20+5:30
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींचा विकास आराखडा (डीपी) तयार करून त्यानुसार गावांचा सर्वांगीण विकास केला जाईल. हे आराखडे तयार करण्यासाठी राज्यात सुमारे
मुंबई : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींचा विकास आराखडा (डीपी) तयार करून त्यानुसार गावांचा सर्वांगीण विकास केला जाईल. हे आराखडे तयार करण्यासाठी राज्यात सुमारे ८ हजार जणांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक गावात किमान तीन दिवस चर्चा करून लोकसहभागातून विकास आराखडा तयार करण्यात येईल, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांना सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी ग्रामविकास विभागामार्फत सादरीकरण करण्यात आले. मुंडे म्हणाल्या की, गावांचा सुनियोजित आणि नियंत्रित विकास व्हावा याकरिता विविध स्रोतातून निधी उपलब्ध होत आहे. प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार केला जाईल. त्यामध्ये ५ वर्षांचा बृहत आराखडा व प्रत्येक वर्षाचा विकास आराखडा तयार केला जाईल.