विकास प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:06 AM2021-07-26T04:06:48+5:302021-07-26T04:06:48+5:30

मुंबई : पुरापासून मुंबईचा बचाव करण्यासाठी खारफुटी प्रचंड महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जन शोषण्याचेही ती काम करते. ‘द ...

Development projects destroy thorns | विकास प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट

विकास प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट

Next

मुंबई : पुरापासून मुंबईचा बचाव करण्यासाठी खारफुटी प्रचंड महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जन शोषण्याचेही ती काम करते. ‘द बेनिफिट्स ऑफ फ्रिंजिंग मॅनग्रूव्ह सिस्टिम्स टू मुंबई’ या अभ्यासानुसार ही खारफुटी दरवर्षी मुंबई शहरासाठी जे काम करतात त्याची किंमत ७.७३ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी होते. विकास प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट होण्याची मोठी भीती आहेच, अशा परिस्थितीत एमएमआर क्षेत्रातील विकासादरम्यान खारफुटीचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे म्हणणे तज्ज्ञांनी २६ जुलै रोजीच्या आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिनानिमित्त मांडले.

स्प्रिंगर नेचर, मुंबई या जर्नलच्या अहवालानुसार गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईभोवतीच्या हरित कवचामध्ये ४२.५ टक्क्यांची घट झाली आहे. १९८८मध्ये मुंबईच्या एकूण ६३,०३५ हेक्टर या क्षेत्रफळामध्ये २९,२६० हेक्टरचे हरित कवच होते, जे २०१८ मध्ये १६,८१४ हेक्टर इतकेच राहिले आहे. ३० वर्षांमध्ये १२,४४६ हेक्टर परिसरावरील हरित कवच नष्ट झाले आहे, हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा मोठा आहे. हे कवच नष्ट झाल्यामुळे मुंबईवर पर्यावरण संकट वाढत आहे, तर दुसरीकडे आज मुंबईसारख्या शहरांमध्ये लोक सी फेस म्हणजेच समुद्र किनारपट्टींच्या घराला पसंती देताना दिसतात. अनेक करोडो रुपये लावून ती घरे खरेदी करतात.

मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग, खारफुटीचा अधिसूचित भाग समाविष्ट आहे. हे क्षेत्र मुंबईला लाभलेली पर्यावरणपूरक नैसर्गिक वनसंपदा आहे. खारफुटीची जंगले संरक्षक असून, मनुष्यवस्त्यांच्या संरक्षणाचे मुख्य काम करतात. खारफुटींमध्ये त्सुनामीसारखी वादळे थोपविण्याची क्षमता आहे. याद्वारे सागरी जैवविविधतेचे संवर्धन होते. जलचर, पाणथळ पक्षी, सुक्ष्म जीव खारफुटीच्या आश्रयाला असतात. मात्र, आर्थिक हव्यासापोटी खारफुटीचे जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासाच्या नावाखाली तिवरांची कत्तल केली जात आहे. काही प्रकल्पांमुळे तिवरे नष्ट होत असून, तिवरे तोडून झोपड्या उभ्या केल्या जात आहेत. पश्चिम आणि पूर्व उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. परिणामी परिसंस्थेमधील महत्त्वाचा घटक असलेल्या तिवरांचा गळा घोटला जात आहे.

- मिठी नदी, खाडी, खारफुटीसह दुर्लक्षित मात्र मोकळ्या भूखंडावर चार बांबू आणि ताडपत्रीच्या मदतीने झोपडी दादांकडून अनधिकृत झोपड्या उभारण्याचे काम सुरूच आहे.

- समुद्र किनारी, खारफुटीच्या जागी, डम्पिंग ग्राऊंडलगत, मिठी नदीच्या किनारी, खाडी किनारी, रस्ता रुंदीकरण अथवा रस्ते काम सुरू असलेल्या अनेक ठिकाणी झोपडीदादांकडून अनधिकृत झोपड्या बांधल्या जातात.

- नव्या झोपड्या बांधल्या जात नाहीत. फार कमी झोपड्या या २ हजारनंतर बांधल्या गेल्या आहेत. कचरा आणि डेब्रिज टाकून झालेल्या भरावावर खारफुटी नष्ट केली जाते. मग पुनर्विकासासाठी मागणी केली जाते.

Web Title: Development projects destroy thorns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.