मुंबईतील विकास कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत*

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:22+5:302021-09-05T04:11:22+5:30

एक्स्प्रेस वेवरील सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रारंभ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईच्या विकासाबरोबरच सौंदर्यीकरणात भर घालून सुरक्षित, स्वच्छ आणि ...

Development work in Mumbai should be of international standard * | मुंबईतील विकास कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत*

मुंबईतील विकास कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत*

Next

एक्स्प्रेस वेवरील सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईच्या विकासाबरोबरच सौंदर्यीकरणात भर घालून सुरक्षित, स्वच्छ आणि हरित मुंबईसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. याअंतर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गावर नागरिकांसाठी सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा पर्यावरण शुभारंभ मंत्री व उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी कलानगर जंक्शन येथे झाला. एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यावेळी उपस्थित होते. ही कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

ठाकरे म्हणाले, मुंबईत अधिक प्रमाणावर सुरक्षित आणि सुंदर अर्बन स्पेसेस तयार करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आहोत. वांद्रे येथील कलानगर जंक्शन ते विमानतळ या महामार्गावर लँडस्केप, नवे बसस्टॉप, हॉर्टिकल्चर, सौंदर्यीकरण, पर्यावरणपूरक टॉयलेट्स अशा अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत.

वाहतुकीचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा व सुखकर होईल. हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत. याच धर्तीवर पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबईला पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरही विकास आणि सौंदर्यीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Development work in Mumbai should be of international standard *

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.