Join us

Narendra Modi: "महाराष्ट्रातील विकास कामं काही काळ रखडली, पण शिंदे-फडणवीस येताच...", PM मोदींनी चुटकी वाजवत सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 6:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं

मुंबई-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोदींनी जाहीर सभेला संभोधित करताना शिंदे-फडणवीस सरकारचा डबल इंजिन सरकार असा उल्लेख करत सरकारची कौतुकाची उधळण केली. तसंच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर विकास कामांना गती मिळाल्याचंही मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता याआधीच्या सरकारला म्हणजेच महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला. "महाराष्ट्रात काही काळासाठी विकास कामं धीम्या गतीनं सुरू होती. पण शिंदे-फडणवी हे डबल इंजिन सरकार येताच विकास कामांना गती मिळाली", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुटकी वाजवत हक्कानं सांगितलं आणि महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 

पंतप्रधान मोदींनी यावेळी मुंबईच्या विकास कामांवर आवर्जुन भाष्य करत आगामी काळात मुंबईच्या विकासासाठी पैशाची अजिबात कमतरता पडू देणार असल्याचं सांगितलं. "मुंबईतील लोकांची प्रत्येक अडचण आणि समस्या समजून घेऊन एक गोष्ट मी जबाबदारीनं सांगतो की भाजप आणि एनडीए सरकार विकास कामांच्या आड कधीच येत नाही. विकास कामांमध्ये कधीच भाजपा सरकार राजकारण आणत नाही. येत्या २५ वर्षात देशाच्या विकासात शहरांचा मोठा वाटा असणार आहे आणि या शहरांमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांचा सहभाग असणार आहे. मुंबई देशाची धडकन आहे. येणाऱ्या काही वर्षात मुंबईचा कायापालट होणार आहे. पण यासाठी राज्य आणि स्थानिक पालिकेतील सरकारनं हातात हात घेऊन काम करणं गरजेचं आहे. शहराच्या विकासात पालिकेची भूमिका खूप महत्वाची असते. जर विकासाची अडवणूक करणारी भूमिका असेल तर शहराचा विकास होऊ शकत नाही", असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

मुंबईच्या हक्काच्या पैशाचा योग्य विनियोग व्हायला हवामुंबईच्या विकासासाठी बजेटची अजिबात कमतरता नाही. पण लोकांच्या हक्क्याच्या पैशाचा सुयोग्य विनियोग व्हायला हवा. भ्रष्टाचार होणार असेल तर शहराचा विकास होऊ शकत नाही. मुंबईला भविष्यासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठिशी उभं राहून विकासाभिमूख दृष्टीकोन ठेवणं गरजेचं आहे, असं मोदी म्हणाले.

टॅग्स :नरेंद्र मोदी