Join us

Devendra Fadanvis: मिटकरींनी मौन सोडलं, फडणवीसांच्या हनुमान चालिसात काढली चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 10:15 AM

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली. ते मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते

मुंबई - राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन तापलेलं वातावरण दिवसेंदिवस अधिक गरम होत आहे. राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करत स्वत: हनुमान चालिसा म्हणून दाखवली. हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर काय पाकिस्तानात म्हणणार का? जर हनुमान चालीसा म्हटल्यामुळे राजद्रोह ठरणार असेल तर भाजपाचा प्रत्येक सदस्य राजद्रोह करण्यासाठी तयार आहे, असेही ते म्हणाले. फडणवीसांच्या हनुमान चालिसा म्हटल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराने त्यांच्यावर टिका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली. ते मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी फडणवीसांनी थेट पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवत सरकारवर निशाणा साधला. जय हनुमान ज्ञान गुण सागर... असे म्हणत फडणवीसांनी हनुमान चालिसाच म्हटली. त्यांच्या या हनुमान चालिसा पठणानंतर उपस्थित भाजप नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या हनुमान चालिसा म्हणण्यात चूक काढली आहे.

ब्राह्मण समाजाच्या आक्रमतेनंतर मौन हेच सर्वश्रेष्ठ म्हणणारे मिटकरी आता पुन्हा ट्विटवरुन टिका करण्यास सक्रीय झाल्याचे दिसून येते. फडणवीस यांच्यावर टिका करताना, त्यांनी हनुमान चालिसा म्हणतात चूक केल्याचं मिटकरींनी म्हटलं. ''आदरणीय देवेंद्रजी हनुमान चालीसातील बर्‍याच ओळी चुकल्या आहेत. संपुर्ण चालीसा माहीत करून घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात एकदा हजेरी लावून पुर्ण पाठ करून घ्यावा, ही विनंती, असे ट्विट मिटकरी यांनी केलंय.  

म्हणून बैठकीला भाजप हजर नाही

दरम्यान, राज्यात मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. पण, या बैठकीवर भाजपानं बहिष्कार टाकला आणि याबाबत पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी पक्षाची भूमिका मांडली. सरकार जर हिटलरी प्रवृत्तीनं वागत असेल आणि त्यांना हवं तेच करत असेल तर या बैठकीला उपस्थित राहून काय उपयोग? त्यामुळे अशा सरकारसोबत संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :अमोल मिटकरीदेवेंद्र फडणवीसभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस