Join us

Devendra Fadanvis: '...नाहीतर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढाल'; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने सभागृहात पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 10:29 PM

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित सादर करण्यात आला. 

मुंबई: आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. (Maharashtra Budget 2023) या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. सर्वच क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूदी केल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी घोषणा करण्यात आलेल्या आहेत. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित सादर करण्यात आला. 

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उल्लेख करत राज्य सरकार पंचामृतांवर आधारित अर्थसंकल्प मांडत असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणं पहिल्या चार अमृत योजनांचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी शेवटच्या पाचव्या योजनाचा उल्लेख केला. मी पंचामृतापैकी पंचम अमृताकडं वळतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर फडणवीस म्हणाले, मला सावधानतेनं बोलावं लागतं कारण अमृताकडं वळतो म्हटल्यानंतर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढाल...देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान, अर्थसंकल्पात अनेक महामंडळाची नावे घेतली, पण त्यांना किती निधी देणार हे सांगितलं नाही. कुठल्याही बाबतीत ठोस किती निधी दिला, याबद्दल काहीच माहिती दिली गेली नाही. गेल्यावेळेस आमच्या अर्थसंकल्पात ज्या गोष्टी होत्या, त्यातील अनेक गोष्टी यांनी रिपीट केल्या आहेत. १ एप्रिलला जनतेला मोठा झटका बसणार. ३०-३५ टक्के विज दरवाढ होणार. त्यांनी अर्थसंकल्पात सांगितलं नाही, पण नंतर सांगतील. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करण्यापेक्षा त्यांच्या पिकांना योग्य भाव द्या. महिलांबाबात मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा होती, पण घोषणा झाली नाही. फक्त भरिव तरतूद करणार असं म्हणतात, पण भरिव म्हणजे किती करणार स्पष्ट करा,' असंही अजित पवार म्हणाले. 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना-

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता १२००० रुपयांचा सन्माननिधी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष ६००० रुपये राज्य सरकार देणार, केंद्राचे ६००० आणि राज्याचे ६००० असे १२००० रुपये प्रतिवर्ष मिळणार, ६९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा- 

आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेण्यात येत होती. आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता, शेतकर्‍यांना केवळ १ रुपयांत पीकविमा, ३३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये त्यामुळे आता ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार,  नवीन २०० रुग्णालयांचा यात समावेश करणार, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून ४ लाखांपर्यंत, राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना निर्माण करणार

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र बजेट 2023अमृता फडणवीस