Devendra Fadanvis:... तोपर्यंत 'संभाजीनगर' विसरा, फडणवीसांनी भरसभेत केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 09:22 PM2022-05-15T21:22:57+5:302022-05-15T21:25:48+5:30

संभाजीनगर नामांतरावरुनही मुख्यमंत्र्यांवर जबरी टिका केली. 

Devendra Fadanvis: Forget 'Sambhajinagar' till then, Fadnavis did mimicry of Uddhav Thackeray | Devendra Fadanvis:... तोपर्यंत 'संभाजीनगर' विसरा, फडणवीसांनी भरसभेत केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री

Devendra Fadanvis:... तोपर्यंत 'संभाजीनगर' विसरा, फडणवीसांनी भरसभेत केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री

Next

मुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत भाजपवर शरसंधान साधले. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दात टिका केली. तसेच, केंद्रातील भाजप सरकारवर महागाईच्या मुद्द्यावरुन जबरी टिका केली. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या गोरेगावच्या नेस्को येथील सेंटरमध्ये होत असेल्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या सभेत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांची सभा ही लाफ्टर सभा, लाफ्टर सभा, लाफ्टर सभा होती, असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. तसेच, बाबरीच्या मुद्द्यावरुन केलेल्या टिकेलाही प्रत्युत्तर दिलं. संभाजीनगर नामांतरावरुनही मुख्यमंत्र्यांवर जबरी टिका केली. 

Devendra Fadanvis: तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, बाबरीवरुन फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadavis: "बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं, आता एवढं..."

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेसाठी जमलेल्या लोकांना उद्देशून का हालचाल बा... सब ठिक बा.. असे म्हणत फडणवीसांनी हिंदी भाषेत भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दाऊदशी संबंध, कोविडमधील भ्रष्टाचार, मनसुख हिरेनप्रकरणावरुन राज्य सरकारवर टिका केली. गेल्या 2.5 वर्षात या महाशयांनी राज्याच्या विकासासंदर्भात एकही भाषण दिलं नाही. हनुमान चालिसेतील दोनच ओळी या सरकारला माहिती आहेत. त्यातूनच, यशवंत जाधवांनी 5 पट संपत्ती जमा केली अन् मातोश्रींना 50 लाखांचं घड्याळ भेट दिलं, असे म्हणत शिवसेनेवर टिका केली. 


वो खैरे व्हा आता भैरे
औरंगाबदचा कायम झाला खसरा

भाजपचं सरकार येत नाही, तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असे फडणवीसांनी म्हटले.

तसेच, तुमचे कालचे भाषण पूर्णत: सोनियांना समर्पित होते. आम्ही तुमच्याच लाईनवर बोलतो, हे सांगण्यासाठी काँग्रेसची भाषा त्यांनी वापरली. संघावर जशी काँग्रेस टीका करते, तीच भाषा त्यांनी वापरली. आता संभाजीनगरचा विषय विसरा. कारण, मुख्यमंत्री कालच म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी होते, असे म्हणत फडणवीसांनी औरंगाबादच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, आता भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असेही फडणवीस यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. 

"बाळासाहेब ठाकरे Sharad Pawar यांना मैद्याचं पोतं म्हणायचे, त्याच पोत्यावर नाक घासून उद्धवजी मुख्यमंत्री झाले"; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

आम्ही मंदिरात झोपलो, फुटपाथपर झोपलो

मी जेव्हा म्हटलं राम मंदिर आंदोलनात तुमचा एकही नेता नव्हता, तेव्हा किती मिर्ची लागली. अरे, ''मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू. तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, असे म्हणत फडणवीसांनी बाबरी मशिद पाडायला गेलेल्या टिकेवरुन उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला केला. 1992 मध्ये फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो, जुलै महिन्यात मी वकील झालो, आणि डिसेंबर महिन्यात नगरसेवक देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, असे म्हणत आम्ही अयोध्येला गेलो होतो. मी तुरुंगातही गेलो होतो, कारसेवेला गेलो तेव्हा हा फडणवीस तुरुंगात होता. आम्ही फाईव्ह स्टार राजकारण केलं नाही, आम्ही मंदिरात झोपलो, प्लॅटफॉर्मवर झोपलो, फुटपाथवर झोपलो, तिकीट काढायलाही पैसे नव्हते, असे म्हणत फडणवीसांनी बाबरीचा त्यांचा प्रवास सांगितला. 

तेव्हा माझं वजन 128 किलो होतं

बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं, आता माझं वजन 102 किलो आहे. आता, हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं. 
 

Web Title: Devendra Fadanvis: Forget 'Sambhajinagar' till then, Fadnavis did mimicry of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.