Join us

Devendra Fadanvis: "अरे ओवेसी सुनले", फडणवीसांनी अकबरुद्दीन औवेसींनाही सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 10:13 PM

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत भाजपवर शरसंधान साधले.

मुंबई - विरोधी पक्षनेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गोरेगावच्या नेस्को येथील सेंटरमध्ये होत असेल्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या सभेत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांची सभा ही लाफ्टर सभा, लाफ्टर सभा, लाफ्टर सभा होती, असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. तसेच, बाबरीच्या मुद्द्यावरुन केलेल्या टिकेलाही प्रत्युत्तर दिलं. संभाजीनगर नामांतरावरुनही मुख्यमंत्र्यांवर जबरी टिका केली. तर, औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्या ओवेसींनाही सुनावलं. 

Devendra Fadanvis: तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, बाबरीवरुन फडणवीसांचा पलटवार

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत भाजपवर शरसंधान साधले. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दात टिका केली. तसेच, केंद्रातील भाजप सरकारवर महागाईच्या मुद्द्यावरुन जबरी टिका केली होती. फडणवीस यांनी उत्तर सभेतून मुख्यंत्र्यांवर प्रहार केला. 

''मुख्यमंत्री कालच म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी होते,'' असे म्हणत फडणवीसांनी औरंगाबादच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, आता भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असेही फडणवीस यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. अकबरुद्दीन ओवेसींची पाठराखण हे सरकार करत असल्याचं म्हणत ओवेसींनाही खडसावले.  अरे ओवेसी सुनलेकुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर !अब जो भगवा लहरायेगा, पुरे हिंदुस्थान पर..! पुरे हिंदुस्थान पर, भगवा लहरायेगा पुरे हिंदुस्थान पर !!असे म्हटले. 

Devendra Fadanvis:... तोपर्यंत 'संभाजीनगर' विसरा, फडणवीसांनी भरसभेत केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री

वो खैरे व्हा आता बहिरेऔरंगाबदचा कायम झाला खसराभाजपचं सरकार येत नाही, तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असेही फडणवीसांनी म्हटले. तसेच, तुमचे कालचे भाषण पूर्णत: सोनियांना समर्पित होते. आम्ही तुमच्याच लाईनवर बोलतो, हे सांगण्यासाठी काँग्रेसची भाषा त्यांनी वापरली. संघावर जशी काँग्रेस टीका करते, तीच भाषा त्यांनी वापरली. आता संभाजीनगरचा विषय विसरा. 

आम्ही मंदिरात झोपलो, फुटपाथपर झोपलो

मी जेव्हा म्हटलं राम मंदिर आंदोलनात तुमचा एकही नेता नव्हता, तेव्हा किती मिर्ची लागली. अरे, ''मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू. तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, असे म्हणत फडणवीसांनी बाबरी मशिद पाडायला गेलेल्या टिकेवरुन उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला केला. 1992 मध्ये फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो, जुलै महिन्यात मी वकील झालो, आणि डिसेंबर महिन्यात नगरसेवक देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, असे म्हणत आम्ही अयोध्येला गेलो होतो. मी तुरुंगातही गेलो होतो, कारसेवेला गेलो तेव्हा हा फडणवीस तुरुंगात होता. आम्ही फाईव्ह स्टार राजकारण केलं नाही, आम्ही मंदिरात झोपलो, प्लॅटफॉर्मवर झोपलो, फुटपाथवर झोपलो, तिकीट काढायलाही पैसे नव्हते, असे म्हणत फडणवीसांनी बाबरीचा त्यांचा प्रवास सांगितला.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसऔरंगाबादअसदुद्दीन ओवेसी