Devendra Fadanvis : सलीम पटेल कुख्यात गुंड असल्याचं मला माहिती नाही, मलिकांनी आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 02:58 PM2021-11-09T14:58:46+5:302021-11-09T14:59:39+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत.

Devendra Fadanvis : I did not know that Salim Patel was a notorious goon, Nawab Malik denied the allegations | Devendra Fadanvis : सलीम पटेल कुख्यात गुंड असल्याचं मला माहिती नाही, मलिकांनी आरोप फेटाळले

Devendra Fadanvis : सलीम पटेल कुख्यात गुंड असल्याचं मला माहिती नाही, मलिकांनी आरोप फेटाळले

googlenewsNext
ठळक मुद्देआम्ही पूर्णपणे भाडेकरू होतो, जागेच्या मालकीनीने आम्हाला जागा विकत घेण्याचं सांगितलं, तेव्हा तेथील वॉचमनने जागेवर आपलं नाव लावलं होतं, म्हणून आम्ही त्यास पैसे दिल्याचं मलिक यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज खळबळ उडवून दिली. मात्र, आता नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत, मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे म्हहटले. तसेच, त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. सलीम पटेल आणि सरदार वली खान यांच्याशी झालेल्या व्यवहाराची माहितीही त्यांनी दिली. 

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. मात्र त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केल्याचे मलिक यांनी म्हटले. तसेच, सलीम पटेल आणि सरदार वली खानबद्दलही माहिती दिली. सरदार वली खानचे गोवावला कंपाऊंडमध्ये आजही घर आहे. गेल्या 70 वर्षांपासून त्याच कंपाऊंडमध्ये वली खानचे वडील हे गोवावाल परिवारासाठी एका वॉचमनचं काम करत होते. जेव्हा आम्ही गोवावाला कुटुंबीयांकडून ही संपत्ती घेतली, त्यावेळी वली खान यांनी 300 मीटर जागेवर आपलं नाव लावून घेतलं होतं. ज्यावेळी आम्ही नोंदणी कार्यालयात गेलो, तेव्हा 300 मीटरचे पैसे देऊन आम्ही जागा विकत घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. आम्ही कुठल्याही दबावात किंवा अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या आरोपींकडून आम्ही ही जागा विकत घेतली नाही, असे मलिक यांनी सांगितले. आम्ही पूर्णपणे भाडेकरू होतो, जागेच्या मालकीनीने आम्हाला जागा विकत घेण्याचं सांगितलं, तेव्हा तेथील वॉचमनने जागेवर आपलं नाव लावलं होतं, म्हणून आम्ही त्यास पैसे दिल्याचं मलिक यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

सलीम पटेल हे गोवावाला कुटुंबीयांशी संबंधित होते, त्यामुळे त्यांच्याकडून मालकी हक्क घेण्यासाठी आम्ही जागेची खरेदी नोंदणी केल्याचं मलिक यांनी म्हटलं. मी हसीना पारकरला ओळखत नाही, कुठल्याही अंडरवर्ल्ड गँगवारशी आपला संबंध नाही, असे मलिक यांनी म्हटले. मी कुठलिही चूक केली नाही. सलीम पटेल अब्स्कॉन्डींग किंवा ते कुख्यात गुंड आहेत, याची मला कुठलिही माहिती नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे. तसेच, टाडा लागलेल्या गुन्हेगारासंदर्भात तसा कुठलाही कायदा नाही, असेल तर त्यांनी तशी कारवाई करावी, असेही मलिक यांनी म्हटले. 

हा भिजलेला फटका, मी उद्या बॉम्ब फोडणार

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. मात्र त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केले आहे. आज फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांचा फटाका भिजलेला निघाला. आता उद्या सकाळी मी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हाड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. अंडरवर्ल्डच्या माध्यमातून शहराला कुणी ओलीस धरले होते. कुठला आंतरराष्ट्रीय डॉन भारताता आला होता. तो कोणासाठी काम करत होता, हे उद्या उघड करणार आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

फडणवीसांचे मलिक कुटुंबीयांवर गंभीर आरोप

दरम्यान, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिकांनी कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. बॉम्बस्फोटातील आरोपींविरोधात टाडा लागला होता. टाडा लागलेल्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते. त्यामुळे ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? २००३ मध्ये नवाब मलिक मंत्री होते. मलिकांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध होते. १९९३ च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले. ज्या लोकांनी स्फोट घडवले. रेकी केली या लोकांसोबत जमीन व्यवहार करण्यामागे काय हेतू होता? असा सवाल त्यांनी केला. 
 

Web Title: Devendra Fadanvis : I did not know that Salim Patel was a notorious goon, Nawab Malik denied the allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.