Join us

Devendra Fadanvis : 'शरद पवारांनाही कळायला हवं, त्यांचे मंत्री काय दिवे लावताहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 1:13 PM

सरदार शहावली खान हे 1993 च्या बॉम्बस्फोटात गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आहेत. टायगर मेमनच्या नेतृत्वात ते या बॉम्बस्फोटोत सहभागी होते.

ठळक मुद्देसलीम पटेल हे तेच आहेत, ज्यावेळी एका आर.आर.पाटील इफ्तार पार्टीला गेले होते, त्या पार्टीत असलेला दाऊदचा हस्तक म्हणजे सलीम पटेल. हसीन पारकरचा हा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर आहे

मुंबई - क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावले होते. तसेच मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा करत दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडला. नवाब मलिक यांचे मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींशी आर्थिक संबंध आहेत, असे फडणवीस यांनी कागदपत्रांचा दाखला देत सांगितले.  

नवाब मलिक यांनी लवंगी लावली, आम्ही दिवाळीनंतर बॉम्ब फोडू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार आज दुपारी १२ वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये, मलिक कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी हितसंबंध आणि आर्थिक व्यवहार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

सरदार शहावली खान हे 1993 च्या बॉम्बस्फोटात गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आहेत. टायगर मेमनच्या नेतृत्वात ते या बॉम्बस्फोटोत सहभागी होते. टायगर मेमनच्या ज्या इमारतीमध्ये हे कारस्थान शिजलं, त्या मिटींगला ते स्वत: उपस्थित होते. या बॉम्बस्फोटाची संपूर्ण माहितीही त्यांच्याकडे होती. ज्याठिकाणी आरडीएक्स भरलं त्याठिकाणीही ते होते. तर, महमद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांच्याशीही नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांचे संबंध आहेत. 

सलीम पटेल हे तेच आहेत, ज्यावेळी एका आर.आर.पाटील इफ्तार पार्टीला गेले होते, त्या पार्टीत असलेला दाऊदचा हस्तक म्हणजे सलीम पटेल. हसीन पारकरचा हा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर आहे. हसीन आपा म्हणजे दाऊदची बहिण. हसीन आपाचा फ्रंटमॅन म्हणजे, ज्याच्यानावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार व्हायची तोच हा सलीम पठाण, असे म्हणत या दोन्ही गुन्हेगारांचे संबंध नवाब मलिक यांच्याशी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, कुर्ल्यातील एलबीएस रोडवर अतिशय महागडी जागा होती. सलीम पटेल आणि सरदार शहावली खान यांच्याकडे या जागेची मालकी होती. ती सॉलिडस कंपनीला ही जागा विकण्यात आली, त्यामध्ये फराज मलिक यांनी सही केली आहे. मलिक कुटुंबीयांनी ही जमीन विकत घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे, हे सर्व कागदपत्रे आणि पुरावे मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. कारण, शरद पवारांनाही कळायला हवं, त्यांच्या मंत्र्यांनी काय दिवे लावलेत, असे म्हणत फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.  

काय होता मलिक यांचा आरोप

ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीसनवाब मलिक