Devendra Fadanvis: डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का? गृहमंत्र्यांना फडणवीसांचं होकारार्थी उत्तर, नावही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 08:46 PM2022-03-14T20:46:38+5:302022-03-14T21:23:04+5:30

Devendra Fadanvis News: देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सादर करण्यात येत असलेल्या पेन ड्राईव्हवरून टोला लगावताना दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का? असा टोला लगावला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांना खरमरीत प्रत्युत्तर दिले.

Devendra Fadanvis open Detective agency? Fadnavis's affirmative answer to the Home Ministers question | Devendra Fadanvis: डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का? गृहमंत्र्यांना फडणवीसांचं होकारार्थी उत्तर, नावही सांगितलं

Devendra Fadanvis: डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का? गृहमंत्र्यांना फडणवीसांचं होकारार्थी उत्तर, नावही सांगितलं

Next

मुंबई - आज विधानसभेमध्ये राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सादर करण्यात येत असलेल्या पेन ड्राईव्हवरून टोला लगावताना दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का? असा टोला लगावला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांना खरमरीत प्रत्युत्तर दिले. गृहमंत्र्यांना सांगा की मी एक एफबीआय काढलाय. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, असं तिचं नाव आहे, असे फडणवीस म्हणाले.

विधानसभेत फडणवीसांनी सादर केलेल्या पेन ड्राईव्हबाबाती सीआयडी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. तसेच फडणवीस यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी उघडली आहे का, असा चिमटा काढला. याबाबत पत्रकार परिषदेत विचारले असता फडणवीस म्हणाले की, गृहमंत्र्यांना सांगा की मी एक एफबीआय काढलाय. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेश. हे विरोधी पक्षनेत्याचं कामच आहे. विरोधी पक्षनेत्याकडे शोषित, वंचित, पीडित असे सगळे लोक पुरावे आणून देत असतात. त्यांना अपेक्षा असते की, सरकारकडून जिथे अन्याय होतोय तिथे आपल्याला विरोध पक्षनेता न्याय मिळवून देईल. म्हणून आमच्याकडे या गोष्टी येत असतात. अजूनही येतील. मला त्या मांडाव्याच लागतील. त्या मी मांडणारच, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार पुढच्या काही दिवसांत प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की,आठ आठ तास बँकेत बसून ज्या प्रकारची माहिती मिळवली जातेय. त्यावरून प्रवीण दरेकरांना टार्गेट बनवण्याचं काम हे सरकार करणार आहे हे स्पष्ट आहे.पहिल्या प्रकरणात स्थगिती मिळालीय. दुसऱ्या प्रकरणातही काही मिळालं. नाही आता ओढूनताणून केस करण्याचं काम सुरू आहे. ते आम्हाला दिसतंय. त्यांनी केस तयार केली तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते सध्या सातत्यानं पेन ड्राईव्ह आणत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सोपवला. त्यानंतर आज त्यांनी आणखी एक पेन ड्राईव्ह विधानसभेत आणला. फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का, असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत विचारला.

देवेंद्र फडणवीसांनी स्टिंग ऑपरेशनचा दावा केला. १२५ तासांचं फुटेज असल्याचं ते म्हणतात. गरज पडल्यास ते आणखी काही पेन ड्राईव्ह आणतील की नाही ते मला माहीत नाही. पण याआधी फडणवीसांनी राज ठाकरेंना एक पेन ड्राईव्ह पाठवला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह आणला. आज दुसरा पेन ड्राईव्ह आणला. फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का, अशी विचारणा वळसे-पाटील यांनी केली.

Web Title: Devendra Fadanvis open Detective agency? Fadnavis's affirmative answer to the Home Ministers question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.