Devendra Fadanvis: खरंच, मला पुरणपोळी नका देऊ; फडणवीसांनी सांगितले आवडीचे पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 02:28 PM2022-05-01T14:28:47+5:302022-05-01T14:30:21+5:30
अमृता फडणवीस झी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या
मुंबई - भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमी चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीस राजकीय क्षेत्रात आक्रमकपणा आणि ठामपणामुळे प्रसिद्ध आहेत. तर, अमृता फडणवीस यांची ओळख केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून नाही, तर नावाजलेल्या गायिका आणि बँकिंग क्षेत्रातील यशस्वी महिला म्हणूनही आहे. त्यासोबतच, आपले विचार बिनधास्त मांडण्यामुळेही त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पती देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळ्या खूप आवडतात, असे म्हटले होते. यावर, आता देवेंद्र फडणवीसांनीच मला पुरणपोळ्या आवडत नसल्याचे सांगितले आहे.
अमृता फडणवीस झी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या अनेक आठवणी यावेळी अमृता फडणवीस यांनी शेअर केल्या आहेत. त्यावेळी, देवेंद्रजी 30 ते 35 पोळ्या पातेलंभर तुप सहज खाऊ शकतात, असे अमृता यांनी म्हटले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ते नाकारले आहे. तेव्हापासून मला जिथं जाईल तिथं पुरणपोळीच दिली जाते. मला जेवणाच्या आमंत्रणातही पुरणपोळीच देण्यात येते. पण, मला खरंच पुरणपोळी नाही आवडत. मला
एबीपी माझाने आयोजित केलेल्या महामाझा कट्टा कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हेही सहभागी झाले होते. त्यावेळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ट्रोलर्सबाबत बेघडक मत मांडले. तसेच, पुरणपोळ्यासंदर्भातील किस्साही शेअर केला. देवेंद्रजींच्या एका मित्राने लग्नातील किस्सा सांगताना, त्यांनी 30 ते 35 पुरणपोळ्या खाल्याचं सांगितलं होतं. तो मित्र अतिशय जवळचा होता, त्यावर विश्वास ठेऊन मी हे सांगितलं होतं, असे अमृता यांनी म्हटलं. त्यानंतर फडणवीसांनी, मला पुरणपोळी नका पाठवू, त्या जास्त आवडत नसल्याचं स्पष्ट केलं. मी फार तर एखादी पुरणपोळी खाऊ शकेल. मी सर्वांना विनंती करतो की, मला पुरणपोळी नका देत जाऊ. मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतात, बंगाली मिठाई आवडते, हे आवडीचे पदार्थ त्यांनी या कार्यक्रमात सांगितले.
अमृता फडणवीसांनी सांगितलेला तो किस्सा
एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात, असा प्रश्न अमृता फडणवीस यांना सूत्रसंचालक अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेने विचारला होता. त्यावर, ते ३० ते ३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असे उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले. तर लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना ३० ते ३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असे मिश्किल उत्तर मिसेस फडणवीस यांनी दिले होते.
टोलर्संच्या कमेंटचा आनंद घेते
अमृता फडणवीस यांनी एबीपी माझाने आयोजित केलेल्या महामाझा कट्टा कार्यक्रमात बेधडक मत मांडलं. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस दोघेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ट्रोलर्सबाबत बेघडक मत मांडले. तसेच ट्रोलर्स मामी म्हणून ट्रोल करतात, त्याबाबत काय वाटते, असे विचारले असता अमृता फडणवीस यांनी मल्ला मज्जाच वाटते असे सांगितले. यावेळी आपलं ट्रोलिंग करणाऱ्या ट्रोलर्सचे आभार मानत अमृता फडणवीस यांनी त्यांना खोचक टोला लगावला. त्या म्हणाल्या, मी त्रिशंकू सरकारच्या ट्रोलर्सना नक्कीच धन्यवाद देईन कारण त्यांच्यामुळेच माझ्यातील स्त्रीशक्तीचा जागर झाला आहे. मी असेत माझे विचार व्यक्त करत राहीन, तुम्ही मला असेच ट्रोल करत राहा, अशीही मी तुम्हाला विनंती करते, असा टोला त्यांनी लगावला.