Devendra Fadanvis: "शरद पवाराचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:51 PM2022-08-10T12:51:33+5:302022-08-10T12:52:23+5:30

भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना आणि सहकारी पक्षांना संपविण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केल्यासंदर्भात देवेंद्र फडणीसांना प्रश्न विचारण्यात आला होता

Devendra Fadanvis: Sharad Pawar's grief is different, Devendra Fadanvis says, we all know it | Devendra Fadanvis: "शरद पवाराचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय"

Devendra Fadanvis: "शरद पवाराचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय"

Next

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या 9 आणि शिंदे गटातील 9 आमदारांनी शपथ घेतली. त्याचवेळी दुसरीकडे बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. केवळ भाजप नाही, तर एनडीएला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी महागठबंधन केले आणि राजकीय वर्तुळाला धक्का दिला. त्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर घणाघाती टीका केली असून, नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यानंतर, फडणवीसांनी शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना आणि सहकारी पक्षांना संपविण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केल्यासंदर्भात देवेंद्र फडणीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, उत्तर देताना पवारांचं दु:ख जरा वेगळंच आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. ''आमच्याकडे 115 आमदार आहेत, आमच्या मित्र पक्षाकडे 50 आमदार आहेत. तरीही आमच्यासोबतच्या पक्षाला मुख्यमंत्री केलं. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 9 आणि शिवसेनेच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. पवारसाहेबांचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय,'' असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांच्या आरोपाला प्रत्यु्त्तर दिलंय. ठाणे येथे लोकमतच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी पवारांच्या प्रतिक्रियेबद्दल विधान केले. 

तेव्हा डिफेक्शनचे कायदेच नव्हते

शरद पवारांनी पक्ष बदलला तेव्हा कायदेच नव्हते. डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा, कोणालाही कसेही बदलता येतात. आज कायदे तयार झालेले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे, ती एकनाथ शिंदे आणि शिवसेना करत आहे, असे म्हणत शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या पक्षातील चिन्हाच्या वादावर फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे. 

काय म्हणाले शरद पवार

निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी महागठबंधन करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.

शंभूराजे देसाईंचं पवारांना प्रत्युत्तर   

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, शरद पवारांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आदर आहे. पवारांनी काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी पक्ष काढला. परंतु आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही तर आम्हीच मूळ शिवसेना आहोत. बहुमतात आहोत. आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच यांच्यातही बहुमत आहे. आम्ही मूळ शिवसेना असल्याने जी चिन्हाबाबत निर्णय घेणारी संस्था निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे आम्ही आमचं म्हणणं मांडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पडताळणी करून निर्णय घेतील. आम्ही मूळ शिवसेना आहोत हे आमचं म्हणणं कालही, आजही तेच आहे असं त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Devendra Fadanvis: Sharad Pawar's grief is different, Devendra Fadanvis says, we all know it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.