Join us

Devendra Fadanvis : 'आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 7:36 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साताऱ्यातील सभा प्रचंड गाजली होती. विशेष म्हणजे पावसातील या सभेमुळे उदयनराजे भोसलेंना पराभवाचा सामना करावा

ठळक मुद्दे रविवारी जयंत पाटील यांच्यासभेवेळीही पाऊस पडला. त्यामुळे, त्यांच्या सभेची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावरुन, देवेंद्र फडणवीस यांनी पावसात सभा घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

सोलापूर/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक (Pandharpur ByPoll) होणार आहे. देशभरातील पाच राज्यांमधील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राज्यातही प्रचाराचे रण तापताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भर पावसात सभा घेतली. यावरून, देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांना नाव न घेता टोला लगावला आहे. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साताऱ्यातील सभा प्रचंड गाजली होती. विशेष म्हणजे पावसातील या सभेमुळे भाजपा नेते उदयनराजे भोसलेंना पराभवाचा सामना करावा. त्यामुळे, पावसातील सभा चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच, रविवारी जयंत पाटील यांच्यासभेवेळीही पाऊस पडला. त्यामुळे, त्यांच्या सभेची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावरुन, देवेंद्र फडणवीस यांनी पावसात सभा घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.  

मला आत्ताच खासदार रणजीतसिंह निबाळकर म्हणाले देवेंद्रजी आता पावसात सभा घेण्याच तुमची बारी आहे. पण, आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी पंढरपूर येथील सभेतून शरद पवार आणि जयंत पाटील यांना टोला लगावला. महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन आचार, विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे. त्यामुळे, एका निवडणुकीने सरकार बदलत नसले तरी, लोकशाहीत सरकारचा दुराचार, भ्रष्टाचार वाढल्यानंतर त्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मताचा अधिकार सर्वात मोठा असतो, असे म्हणत फडणवीस यांनी पंढरपुरातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 

तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा

जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा ३५ गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवा, अशी मागणी खोत यांनी केली. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली, असे खोत यांनी सांगितले. 

दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होताना दिसत आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसपंढरपूरभाजपाजयंत पाटीलशरद पवार