आज कोण-कोण शपथ घेणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 04:53 PM2022-06-30T16:53:58+5:302022-06-30T17:14:53+5:30
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला.
मुंबई- राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजपा आणि १६ अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच आज फक्त राजभवनात एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी घेतली भेट घेतली. pic.twitter.com/7cu2TxIHay
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपानं १०५ जागा आणि शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. जवळपास १६१ युती आणि अपक्ष मिळून १७० बहुमत आमच्याकडे होते. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नवीन विकास योजना नाही. भ्रष्टाचारात २ मंत्री जेलमध्ये जाणे. एकीकडे मा. बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंध ठेवलेल्या मंत्र्यांला पाठिशी घातले. दररोज सावरकरांचा अपमान, हिंदुत्वाचा तिरस्कार झाला. जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव समंत केल्याशिवाय कॅबिनेट घेता येत नाही. ते प्रस्ताव मंजूर केले. ते वैध मानले जाणार नाहीत. पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला तो निर्णय घ्यावाच लागणार आहे असंही फडणवीसांनी सांगितले.